How Much Sodium Should You Have per Day? शरीराला योग्य मीठ प्रमाणात मीठ मिळाले नाही तर तब्येत बिघडते हे माहिती आहे का?
जेवणाची चव वाढवण्यासोबत मीठ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. मिठाचा वापर अनेक पदार्थात केला जातो. पण जास्त मीठ खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. मीठ खाण्याची देखील पद्धत आहे. मीठ वरून घालून खाणे टाळले पाहिजे. असा सल्ला तज्ज्ञांकडून मिळतो. उन्हाळ्यात जास्त मीठ खाल्ल्याने डिहायड्रेशनचा धोका वाढू शकतो. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांच्या मते मीठ मर्यादित प्रमाणातच खावे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, ”जगातील बहुतांश लोकं दररोज 9 ते 12 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खातात. जे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. मिठाचा वापर कमी केलात तर जगात दरवर्षी अडीच लाख मृत्यू टाळता येतील”
यासंदर्भात, नवी दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलचे, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ अँड वेलनेस विभागाच्या संचालक डॉ. सोनिया रावत सांगतात, ”सर्वांनी ५ ग्रॅमपेक्षा कमी म्हणजेच दररोज १ चमचे मीठ खावे. १५ वर्षांखालील मुलांनी कमी मीठ खावे. जास्त मीठ खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतात. मिठाच्या अतिसेवनाने उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत लोकांनी मीठावर नियंत्रण ठेवावे. जंक फूड आणि स्नॅक्समध्ये भरपूर मीठ असते, त्यामुळे जंक फूड टाळणे उत्तम ठरेल. जेवणात मीठ कमी घालावे.”
हे काम आठवड्यातून एकदा करा

डॉ.सोनिया रावत सांगतात, ”मिठामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी, लोकांनी आठवड्यातून एकदा तरी मीठ टाळावे. असे केल्याने शरीराला मिठापासून होणारी हानी टाळता येईल. जंक फूड आणि प्रोसेस्ड फूड कमी खावे. स्नॅक्समध्येही मिठाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे स्नॅक्स टाळावे. विशेषत: ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी कमी मीठ खावे.”
मिठापासून होणारे तोटे

डॉक्टरांच्या मते, ”जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढण्यासोबतच हातपायांवर सूज येऊ शकते. यासह वारंवार तहान लागू शकते. अति प्रमाणात मीठ खाल्ल्याने कर्करोग, हृदयविकारासह अनेक गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. अशा परिस्थितीत मीठ कमी खावे आणि स्वत:ला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करावा.”
हे वाचलंत का ?
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.