एरंडोल :- दिवसेंदिवस शहर कक्षातील फिडरचा भार हा वाढू लागल्याने आज रोजी महावितरण एरंडोल उपविभागातर्फे एरंडोल शहर कक्षांतर्गत लक्ष्मी नगर ,आदर्श नगर , ओम नगर व अशोक नगर येथील घरगुती 157 ग्राहकांच्या वीज मीटरची तपासणी करण्यात आली .त्यापैकी 17 वीज ग्राहकांनी त्यांच्या मीटर मध्ये फेरफार केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने त्यांचे मिटर महावितरण तर्फे पुढील तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहेत.
चाचणी विभाग धरणगाव येथे सदर मीटरच्या तपासणीनंतर मीटरमध्ये आढळलेल्या त्रुटीप्रमाणे वीज चोरीच्या बिलांची आकारणी करण्यात येणार. व वीज चोरीचे बिल न भरल्यास सदर इसमांवरती त्वरीत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सदर वीज चोरी दरम्यान मीटर मध्ये फेरफार केलेल्या बहुतांश ग्राहकांकडे एसी चा वापर असल्याचे आढळून आले आहे.सदर तपासणी करण्यासाठी दोन पथकांची नियुक्ती करण्यात आलेली होती.
ही मोहीम एरंडोल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आली.या मोहिम मध्ये प्रशांत महाजन सहाय्यक अभियंता एरंडोल शहर कक्ष, श्रीमती लक्ष्मी माने सहाय्यक अभियंता एरंडोल ग्रामीण कक्ष, जयदीपसिंग पाटील सहाय्यक अभियंता गुणवत्ता नियंत्रक एरंडोल उपविभाग , मनोहर पाटील सहायक लेखापाल व इतर सर्व जनमित्र यांनी सहभाग नोंदवला…..सदर मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कार्यकारी अभियंता धरणगाव रमेश पवार साहेब यांचे मार्गदर्शन लाभले..
हे पण वाचा
- Viral Video: मार्केटमध्ये एक सुंदर ड्रेस दोन महिलांना आवडला तो घेण्यावरून सुरू झाला वाद मग सुरू झाली तुंबळ हाणामारी पहा व्हिडिओ
- महाविद्यालयाच्या हॉस्टेलच्या बाथरूममध्ये इतर मुलींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ शूट करून तरुणीने क्लिप्स पाठवल्या प्रियकरास, तरुणीस पोलिसांनी घेतले ताब्यात.
- हृदयद्रावक! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी हळद सुकण्यापूर्वीच नववधूच्या मांडीवर डोके टेकत नवरदेवाने सोडला प्राण, सर्वत्र हळहळ.
- संघटित गुन्हे करणाऱ्या घरफोडीतील गुन्हेगारांना एमआयडीसी पोलिसांनी केले जेरबंद,१लाख ८५ हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त.
- Viral Video:एक्स्प्रेसवेवर तरुणांची सुसाट वेगाने बाईक चालवत जीवघेणी स्टंटबाजी; तोल जाताच कोसळले, मागून आला ट्रक अन् पहा काळजात धडकी भरेल असा व्हिडिओ.