नात्याला काळिमा फासणारी घटना! अल्पवयीन मुलीला पळवून नेत चार महिने अत्याचार करणाऱ्या मावसभावास अटक.

Spread the love

मारवड पोलिसांनी अल्पवयीन मुलगी व मावस भावास धुळे येथून घेतले ताब्यात, पॉक्सोअंतर्गत मारवड पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी | अमळनेर

अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला चार महिन्यांपूर्वी पळवून नेणारा तरुण तिच्या सख्या मावशीचा मुलगा निघाला असून मारवड पोलिसांनी मुलीच्या जबाबावरून धुळे जिल्ह्यातील चिंचवार येथील तरुणावर बलात्कार आणि पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे.त्यास आजच न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे , सख्या मावस भावाने मावशीच्या मुलीला पळवून नेत सतत चार महिने अत्याचार करीत डांबून ठेल्याचा प्रकाराने काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे ,

दिनांक ४ मार्च रोजी अंतुर्ली येथील एका मजूर महिलेची अल्पवयीन मुलगी सकाळी सहा वाजेपुर्वी राहत्या घरातून गायब झाल्याने मारवड पोलिसात फुस लावून पळवून नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी आणि मुलगी धुळे येथे एमआयडीसी मध्ये वास्तव्यास असल्याचे समजले. तांत्रिक माहितीच्या आधारे

हेडकॉन्स्टेबल संजय पाटील, हवालदार मुकेश साळुंखे, उज्वल पाटील यांनी आरोपी आणि मुलीला धुळे येथील एमआयडीसी च्या अवधान येथून आज दिनांक १४ रोजी दुपारी ताब्यात घेऊन मारवड पोलीस स्टेशनला आणले. मुलीला पळवून नेणार आरोपी हिरालाल सोमनाथ मोरे (वय २३) रा चिंचवार जिल्हा धुळे हा मुलीचा मावसभाऊच असल्याचे समजले व त्याने ३ मार्च रोजी सदर मुलीला मोटरसायकलवरून पळवून नेल्याचे कबूल केले. महिला कॉन्स्टेबल रेखा ईशी व मारवड येथील प्रतिष्ठित महिलेच्या समक्ष अल्पवयीन मुलीचा जबाब घेण्यात आला. तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली.

तरुणीचा जबाबावरून आरोपी विरुद्ध अपहरण सह भादवि कलम ३७६ व बालकांचा लैंगिक अत्याचार पॉक्सो कायद्याचे कलम वाढवून अशा विविध सात कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला अटक करण्यात आल्यावर दुपारी २ वाजता अमळनेर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती चौधरी यांनी त्याची चार दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे , मुलीची जळगाव येथे महिला बाल सुधारगृहात रवाना करण्यात आली आहे.पुढील तपास पीएसआय विनोद पाटील हे करीत आहेत. आरोपींला न्यायालयात हजर केले असता ,चार दिवसांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार