बरेली :- येथे एक महिला पोलिस स्टेशनच्या गेटवरून त्याच इसमासोबत पसार झाली, ज्याच्याविरोधात ती तक्रार दाखल करायला चालली होती. या महिलेसह तिचा पती, सासरचे आणि माहेरचे लोकही उपस्थित होते.
मात्र पोलिस स्थानकात आत जायच्या ऐवजी ती महिला सर्वांसमोरच त्या व्यक्तीच्या बाईकवर बसली आणि फरार झाली. सर्वजण पहातच राहिले.महिलेचा पती, सासरचे आणि माहेरचे लोक तिला थांबवण्यासाठी तिच्या मागे हाका मारत गेले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला. ती महिला कधीच पुढे निघून गेली.
फरीदापूर ठाणे क्षेत्रातील एका गावात राहणारी तरूणी लग्नाच्या बदायूं जवळील दातागंज क्षेत्रात गेली होती. तेथे राहणाऱ्या एका युवकाने त्या तरूणीचे काही अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे भडकलेल्या सासरच्या लोकांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर ती तरूणी तिच्या माहेरी परतली. शनिवारी ती महिला पती, सासरचे लोक आणि माहेरच्यांसोबत फरीदपूर पोलिस स्थानकात आरोपी तरूणाविरोधात तक्रार दाखल करण्यास पोलिसांकडे जात होती. तेथे जाऊन ती महिला आरोपी तरुणाचे आणि इतर दोन लोकांविरुद्ध सामूहिक बलात्काराची तक्रार नोंदवणार होती.
त्याच वेळी आरोपी तरूण बाईक घेऊन त्या पीडितेजवळ पोहोचला. ती पोलिस स्टेशनला जायच्या आधीच महिला त्या आरोपी तरूणाच्या बाईकवर बसली आणि निघून गेली. हे पाहून त्या महिलेचा पती, सासरचे आणि माहेरचे लोक तिला हाका मारत, ओरडत तिच्या मागे धावले. हे पाहून आजूबाजूच्या लोकांनीही त्या तरूणाचा आणि महिलेचा पाठलाग करण्यास सुरूवात केली.
मात्र आरोपीने बाईकचा वेग वाढवला आणि कोणाच्याही हातात न सापडताच तो वेगाने पळून गेला. या घटनेनंतर त्या तरूणीच्या आईने आरोपविरोधात अपहरणाची तक्रार नोंदवली. या प्रकरणाचा पुढी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.