मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शुक्रवार १६ जून रोजी मोठ्या वाढीसह बाजार बंद झाला. जोरदार खरेदीनंतर प्रमुख बाजार निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. बीएसई सेन्सेक्स ४६६.९५ (०.७४%) अंकांनी वाढून ६३,३८४.५८ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी १३७.९० (०.७४%) अंकांच्या मजबूतीसह १८,८२६.०० अंकांच्या पातळीवर बंद झाला. शेअर बाजार प्रथमच या पातळीवर बंद झाले आहेत. निफ्टीच्या एफएमसीजी निर्देशांकानेही आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवसात विक्रमी उच्चांक गाठला.
शुक्रवारी बँकिंग क्षेत्रातील समभागांनी बाजारातील मजबूत वाढीला हातभार लावला. या काळात निफ्टी बँक निर्देशांक एक टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. सेन्सेक्समधील ३० पैकी २६ समभाग हिरव्या रंगात रंगले. दुसरीकडे, शुक्रवारी शेअर बाजारात आयकिओ लायटिंगच्या शेअर्सची लिस्टिंग झाली. इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये कंपनीचे शेअर्स इश्यू किमतीपेक्षा ५०% पर्यंत वाढले. काल म्हणजेच गुरुवारी बीएसई सेन्सेक्स ३१० अंकांनी घसरला आणि ६२,९१७ अंकांच्या पातळीवर बंद झाला. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, डॉलरच्या तुलनेत रुपया ३१ पैशांनी मजबूत होऊन ८१.९४ रुपयांवर बंद झाला.
जागतिक बाजारातील तेजीच्या दरम्यान भारतीय बाजारही शुक्रवारी सकारात्मक नोटवर उघडले. या कालावधीत सेन्सेक्सने एवढी ताकद मिळवली आहे की, तो सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला आणि रेकॉर्ड बंद झाला. सेन्सेक्सचा आतापर्यंतचा उच्चांक ६३,५८३.०७ अंक आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निर्देशांकाने ही पातळी गाठली होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रानंतर बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तो २९०.७ लाख कोटी रुपयांवरून २९२.७ लाख रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला.
हे पण वाचा
- Viral Video:सोशल मीडियावर रील बनवायच्या नादात महिलेच्या साडीला लागली आग;अन् पुढे जे झाले ते भयानकच पहा व्हिडिओ
- एक सेलिब्रिटी ज्याचे इन्स्टाग्रामवर 56 लाख फॉलोअर पण त्यास 200 जणांनीही मत दिलं नाही! त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा.
- वारंवार होत असलेल्या भांडणामुळे पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून केली हत्या, स्वतःहून पोलिस ठाण्यात झाला हजर.
- यावल तालुक्यात शेत शिवारात कापूस वेचणी करतांना सर्पदंश झालेल्या ३० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू.
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४