गिरिडीह (झारखंड) :- देशभरात सध्या सगळीकडे लग्नांचा सीझन सुरू आहे. रोज कितीतरी जोडपी लग्नाच्या बंधनात अडकत आहेत.
तर काही लग्ने लागण्याआधीच मोडली जात आहेत. अशीच एक घटना झारखंडमधून समोर आली आहे. इथे लग्नाच्या ऐनवेळी म्हणजे हार घालण्याच्या रिवाजाआधी नवरी प्रियकरासोबत फरार झाली. सध्या या लग्नाची चर्चा परिसरात सुरू आहे.
ही घटना झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यातील आहे. येथील एका गावातील मंदिरात सोमवारी रात्री ही घटना घडली. लग्न मंडपातून एक नवरी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. वरात घेऊन आलेल्या नवरदेवाला रिकाम्या हाती परतावं लागलं.
दोन्हीकडील लोकांनी बीदीडीहच्या बगलासोत शिव मंदिरात लग्न समारंभाचं आयोजन केलं होतं. रात्री मुलीकडील लोक मंदिराच्या परिसरात लग्नाचे रितीरिवाज पार पाडत होते. वरात आली त्यांचं जोरदार स्वागतही करण्यात आलं. त्यानंतर लग्नासंबंधी इतर रितीरिवाज पार पाडले गेले. हार घालण्याची वेळ आली तेव्हा काही कारण सांगत नवरी बाजूला गेली. तिला बोलवण्यासाठी एकाला पाठवण्यात आलं तर ती गायब होती.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, मंदिरापासून 300 मीटर दूर बाइकवर एक तरूण हाती दोन हेल्मेट घेऊन उभा होता. अचानक नवरी लेंहगा घालून मंडपातून बाहेर आली. तिने आतून जीन्स घातली होती. बाहेर आल्यावर तिने लेंहगा काढला आणि हेल्मेट घालून बाइकवरून निघून गेली. मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.