भोपाळ : मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये मुस्लिम तरुणासोबत प्रेमविवाह करणाऱ्या तरुणीच्या कुटुंबीयांनी तिचे पिंडदान केलेयं. या आगळ्यावेगळ्या अंत्ययात्रेचे कार्डही छापण्यात आले होते.आपल्या मुलीला लव्ह जिहादचा बळी असल्याचे सांगताना मुलीच्या आईने ती आमच्यासाठी मेली असल्याचे सांगितले. नर्मदा नदीच्या काठावर दि. ११ जून रोजी पिंडदान करण्यात आले आहे.
मुलीच्या कुटुंबीयांनी फक्त तिचे पिंडदान केले नाही तर श्रद्धाचे जेवनही ठेवले होते. अयाजशी लग्न केल्यानंतर उज्मा अयाजशी लग्न केल्यानंतर उज्मा फातिमा बनलेल्या अनामिकाच्या नातेवाईकांनी सांगितले की, आमच्या मुलीने आम्हाला समाजात कुठेच तोंड दाखवायला जागा सोडली नाही. दुसरीकडे मुलीचा भाऊ म्हणाला की, आम्ही विचार केला होता की, मुलीचे कन्यादान करू पण आता आमच्या पिंडदान करण्याची वेळ आली आहे. तरीही मुलीच्या कुटूंबीयांनी या संपुर्ण घटनेवर जे काही होत ते चांगल्यासाठी होते , अशी प्रतिक्रिया दिली आहे. या पिंडदानादरम्यान मुलीच्या कुटुंबीयांनी संतांच्या सान्निध्यात रडत आपल्या व्यथा मांडल्या.
याआधी नेमक काय घडलं होतं ?……
मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये लव्ह जिहादचे एक प्रकरण उघडकीस आले आहे. अनामिका दुबे नावाची हिंदू तरुणी फातिमा झाली. त्यामुळे फातिमाच्या व्हायरल लग्नपत्रिकेवर पोलिसांकडून कारवाईची मागणी हिंदू संघटनांनी केली आहे. दरम्यान मुलीच्या आईने वराने नाव बदलून आमची फसवणूक केल्याचा आरोपही केला आहे. व्हायरल होत असलेल्या लग्न पत्रिकेमध्ये लग्नाची तारीख ७ जून अशी नोंदवण्यात आली आहे. मात्र , अयाजला क्लीन चिट देताना पोलिसांनी दोन्ही कुटुंबांच्या इच्छेनुसारच लग्न झाल्याची माहिती दिली.
व्हायरल होत असलेल्या लग्न पत्रिकेनुसार , जबलपूरच्या आमखेरा भागातील एका मुलीचे मुस्लिम तरुणासोबतची लग्न पत्रिका सोशल मीडीयावर व्हायरल झाली आहे. अनामिका दुबे हे नाव कंसात दाखवून , या लग्न पत्रिकेत तिचे पहिले नाव उजमा फातिमा दाखवण्यात आले आहे. तसेच लग्न पत्रिकेत अयाजचे नाव वर म्हणून नमूद करण्यात आले असून त्याचे वडील रेल्वेत नोकरी करत
असल्याचे सांगितले आहे. या लग्न पत्रिकेसोबत अनामिका आणि अयाजच्या लग्नाचे प्रमाणपत्रही व्हायरल झाले आहे. ३ साक्षीदारांच्या साक्षीने हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
ही लग्न पत्रिका आणि मॅरेज सर्टिफिकेट व्हायरल झाल्यानंतर हिंदू संघटनांनी निषेध नोंदवण्यास सुरुवात केला. दि. १ जून रोजी हिंदू संघटनांच्या शिष्टमंडळाने जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षकांची भेट घेतली आणि हे प्रकरण षडयंत्र असल्याचे सांगत चौकशीची मागणी केली. मुलीचे धर्मांतर झाल्याचा आरोप करत हिंदू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना निवेदन दिले. दरम्यान, संस्थेशी संबंधित काही लोकांनी मुलीच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली.
मुलीच्या आईने अयाजवर आपल्या मुलीसोबत ‘लव्ह जिहाद’चा कट रचल्याचा आरोपही केला आहे. तसेच आपल्या मुलीला परत घरी पाठवण्याची मागणी केली आहे. अनामिकाच्या आईचा आरोप आहे की, अयाजने स्वतां:चे नाव खोटे सांगून त्यांच्याशी बोलणे केले.
मात्र, जबलपूर पोलिसांनी मुलीच्या आईचे आरोप फेटाळून लावले असून त्यांना सर्व काही अगोदरच माहीत असल्याची माहिती दिली आहे. जबलपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी आणि मुलाचे सुमारे ८ वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते. नोव्हेंबर २०२२ मध्ये लग्न करण्यासाठी दोघांनी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. या कालावधीत दोन्ही कुटुंबीयांनी लग्नाला संमती दिल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे.
हे पण वाचा
- Viral Video:नवरीला लागली हळद,रात्री नाचताना नवरीच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू,ज्या दिवशी तिचे लग्न त्याच दिवशी निघाली अंत्ययात्रा, दोन्ही कुटुंबांमध्ये शोककळा
- चुलत दीरासोबत अनैतिक संबंध, पती पत्नीमध्ये वाद, प्रियकराच्या मदतीने पत्नीने शेतकरी पतीचा केला खून; अन् अपघाताच्या केला बनाव.
- घरकुल योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी सरपंचाने घेतले भिकाऱ्याचे सोंग; पंचायत समिती कार्यालयासमोर ‘भीक मागो’ आंदोलन.
- नवरदेव वऱ्हाडीसह लग्नासाठी मांडवात आला, अचानक मधमाशांनी केला हल्ला,नवरदेव नवरीला घेऊन पळाला,19 वऱ्हाडीं जखमी.
- दुसऱ्या तरुणाशी लग्न का केलं अस म्हणत नवविवाहित दाम्पत्याची कार अडवून नवरीच्या अपहरणाचा प्रयत्न; पण झाले भलतेच….