Viral Video: वारे पठ्ठ्या बनविला देशी जुगाड! (खाटेस)बाजा’ला बनवलं चारचाकी गाडी अन् गेला पेट्रोल भरायला

Spread the love

Viral Video :भारतात टॅलेंटला कमी नाहीये. फक्त त्या टॅलेंटला व्यासपीठ मिळत नाही किंवा ते समोर येत नाही. नाहीतर प्रत्येक गावात कुणी ना कुणीतरी जुगाडू व्यक्ती सापडतो. सध्या अशाच एका जुगाडू कार्यकर्त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याने झोपण्याच्या बाजेलाच गाडी बनवलं आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक जुगाडू तरूणाने झोपण्याच्या बाजेला चार चाकं जोडून त्याला गाडी बनवलं आहे. त्याचबरोबर चाकं वळवण्यासाठी स्टेअरिंगसुद्धा बसवल्याचं यामध्ये दिसत आहे. ही गाडी घेऊन हा जुगाडू पेट्रोल भरण्यासाठी गेला असून यावेळी सगळेजण त्याच्या या गाडीकडे पाहत आहे.

या तरूणाने लावलेला शोध आणि जुगाड पाहून आपणही थक्क व्हाल. चार चाकं बसवून एक मशीन या गाडीला जोडल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनीसुद्धा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.


टीम झुंजार