प्रतिनिधी | एरंडोल. एरंडोल- नागदूली (ता.एरंडोल) येथील दशमाता मंदिराची मागील पत्र्याच्या खालून दगडी बाजू तोडून अज्ञात चोरट्याने आज मध्यरात्रीच्या सुमारास मंदिरातील रोख रकमेसह देवीचेदागिने चोरून नेल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की नागदूली येथे पद्मालय रस्त्यावर दशमाता देवीचे पत्र्याचे मंदिर असून यामध्ये दशमाता देवीच्या चार, कालिकामातेची एक,मोमयमातेची एक व सप्तशृंगी मातेची एक मूर्ती आहे तसेच अन्य देवदेवतांचे फोटो लावण्यात आले आहेत.मंदिरात विलास मंगल महाजन पुजारी म्हणून काम करीत आहेत.
गुरुवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास पुजारी विलास महाजन हे मंदिर बंद करून मंदिराच्या शेजारी असलेल्या त्याच्या निवासस्थानी निघून गेले.शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास मंदिराचे पुजारी विलास महाजन हे उठले आणि मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेकडेप्रात:विधीसाठी जात असतांना त्याना मंदिराच्या मागच्या बाजूचे विटांचे बांधकाम तोडले असल्याचे दिसून आले.पुजारी विलास महाजन यांनी मंदिरात जाऊनबघितले असता मंदिराचे कपाट उघडे असून त्यातील वस्तू अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले.
त्यांनी कपाटात असलेल्या वस्तूंची पाहणी केली असता त्यांना १ लाख ८० हजार रुपयांची रोख रक्कम तसेच पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे टोंगल,४५ हजार रुपये किमतीचे तीन भार वजनाचे चांदीचे पन्नास पाळणे, बारा हजार रुपयेकिमतीच्या देवीच्या चांदीच्या चार मूर्ती,एका दानपेटीत असलेले ३१ हजार रुपये रोख व दुस-या दानपेटीत असलेले १२ हजार रुपये रोख असा सुमारे २ लाख९५ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला.मंदिरात चोरी झाल्याचे दिसताच पुजारी विलास महाजन यांनी गावातील अशोक पाटील,धर्मा पाटील, महेंद्र सोनवणे रामा कोळी,अशोक कोळी,भास्कर कोळी याना मोबाईलवरून मंदिरात चोरी झाल्याचे कळवल्यामुळे त्यांनी त्वरित मंदिराकडे धाव घेवून चोरी बाबत माही जाणून घेतली.
https://www.youtube.com/@zunjaarnews
वरील लिंकवर क्लिक करा, सबस्कराईब करा व आमच्या यू ट्युब ला ज्वाईंट व्हा
Like share and Subscribe our youtube Channel
ग्रामस्थांनी चोरीबाबत आजूबाजूला पाहणी करूनतपास केला असता त्यांना ऐवज आढळून आला नाही.याबाबत पुजारी विलास महाजन यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार चंद्रकांत पाटील तपास करीत आहेत.दरम्यान मंदिरात चोरी झाल्यामुळे गावात खळबळ उडाली असून चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
दरम्यान याच मंदिराच्या जवळच असलेल्या बारा ज्योतिर्लिंग मंदिराची दान पेटी व सुकेश्र्वर येथील मंदिराची देखील दान पेटी चोरट्यांनी लंपास केली आहे. या दोन्ही मंदिराच्या दान पेटीची चोरी ची तक्रार पोलीस स्थानकात करण्यात आलेली नाही.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






