6 ways to reduce bloating: Quick tips and long-term relief ब्लोटिंगचा त्रास होतो अशी तक्रार हल्ली अनेकजण करतात. त्याची कारणं काय आणि उपाय कोणते?
बिघडलेल्या जीवनशैलीमुळे पोट फुगण्याची समस्या निर्माण होते. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आहारात बदल होतो, तेव्हा ब्लोटिंग होते. ब्लोटिंग होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. जसे की वेळेवर न झोपणे, काहीतरी जड खाणे, आहारापेक्षा जास्त खाणे किंवा जीवनशैलीत बदल.
जर आपण ब्लोटिंगच्या समस्येपासून त्रस्त असाल तर, जीवनशैलीत काही बदल, खाण्या – पिण्याच्या सवयींमध्ये बदल यासह डॉक्टरांचा साला घ्यायला हवा. कधीकधी तणाव किंवा हार्मोनल असंतुलनामुळे देखील ब्लोटिंग होऊ शकते. यासंदर्भात, डायटीशियन मनप्रीत यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर ब्लोटिंग सायकल म्हणजे काय, ब्लोटिंग होण्यामागील मुख्य कारण, व ब्लोटिंगवर उपाय याची माहिती दिली आहे
ब्लोटिंग सायकल म्हणजे काय ?

ब्लोटिंगचे मुख्य कारण स्लो मेटाबॉलिज्म आहे.
मंद चयापचयमुळे, अन्न दीर्घकाळ पोटात राहते.
बॅक्टेरिया आणि बुरशीसारखे रोगजनक हे अन्न त्यांचा आहार बनवतात.
यामुळे शरीरातील टॉक्सिन्स वाढतात.
पोटात कचरा जमा होऊ लागतो.
यामुळे आतड्यांमध्ये जळजळ होते आणि ओटीपोटात लिक्विड टिकून राहते.
या पूर्ण चक्रानंतर ब्लोटिंग होते. त्यामुळे उलटी – जुलाब अशी समस्या निर्माण होते.
या टिप्स करतील मदत

अन्न नीट चावून खा. त्यामुळे अन्नाचे पचन नीट होते आणि त्यात असलेले पोषणही शरीर चांगले शोषून घेते.
जेवण करण्यापूर्वी 30 मिनिटे आधी लिंबू पाणी प्या. लिंबू पाणी आपल्या पचनसंस्थेला आराम देते, यासह शरीराचा pH संतुलित राखण्यास मदत करते.
दुपारच्या जेवणात पुदिना दही खा. हे पाचक एंजाइम सक्रिय करून पचन सुधारते.
डाळी आणि भाज्यांमध्ये हिंग जरूर टाका. अन्न पचवण्यासाठी हिंग चांगला मानला जातो. हे आपल्या पोटातील पचनशक्ती सुधारते.
झोपण्यापूर्वी दुधात गुलकंद घालून प्या. यामुळे पचनसंस्थेला आराम मिळतो आणि शरीराचा पीएच लेव्हलही संतुलित राहतो.
हे वाचलंत का ?
- Viral Video: मार्केटमध्ये एक सुंदर ड्रेस दोन महिलांना आवडला तो घेण्यावरून सुरू झाला वाद मग सुरू झाली तुंबळ हाणामारी पहा व्हिडिओ
- महाविद्यालयाच्या हॉस्टेलच्या बाथरूममध्ये इतर मुलींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ शूट करून तरुणीने क्लिप्स पाठवल्या प्रियकरास, तरुणीस पोलिसांनी घेतले ताब्यात.
- हृदयद्रावक! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी हळद सुकण्यापूर्वीच नववधूच्या मांडीवर डोके टेकत नवरदेवाने सोडला प्राण, सर्वत्र हळहळ.
- संघटित गुन्हे करणाऱ्या घरफोडीतील गुन्हेगारांना एमआयडीसी पोलिसांनी केले जेरबंद,१लाख ८५ हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त.
- Viral Video:एक्स्प्रेसवेवर तरुणांची सुसाट वेगाने बाईक चालवत जीवघेणी स्टंटबाजी; तोल जाताच कोसळले, मागून आला ट्रक अन् पहा काळजात धडकी भरेल असा व्हिडिओ.