लखनऊ: उत्तर प्रदेशच्या बहराईच जिल्ह्यात एका सरकारी अभियंत्याच्या घरात गोंधळ झाला. सरकारी निवासस्थानात राहणाऱ्या अभियंत्याच्या घरात त्याची पत्नी अचानक पोहोचली. सोबत तिचे दोन भाऊ होते. त्यावेळी त्यांनी अभियंत्याच्या खोलीत त्याची प्रेयसी दिसली. यानंतर अभियंता आणि त्याच्या पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. महिला आणि तिच्या भावांनी अभियंत्याला चांगलाच चोप दिला. महिलेचे भाऊ भावजींवर अक्षरश: तुटून पडले. यावेळी अभियंत्याची पत्नी आणि प्रेयसीमध्ये कडाक्याचं भांडण झालं.
सिंचन विभागात अभियंता असलेल्याची पत्नी श्रावस्तीमध्ये सरकारी शिक्षिका आहे. काही दिवसांपूर्वी अभियंत्याची पत्नी आजारपणामुळे माहेरी गेली. अभियंताच तिला रायबरेलीला सोडून आला. आपल्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेत पती त्याच्या सरकारी घरात प्रेयसीला बोलवत असल्याची माहिती पत्नीला मिळाली. तिनं ही बाब दोन भावांच्या कानावर घातली.
शिक्षिका असलेल्या पत्नीनं दोन भावांसोबत बरराईचमध्ये त्यांचं घर गाठलं. तिनं पतीला अगदी रंगेहात पकडलं. यानंतर एकच गोंधळ झाला.
अभियंत्याच्या मेहुण्यांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अभियंत्याच्या पत्नीनंदेखील प्रेयसीला चोपलं. यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अभियंत्याचं सरकारी निवासस्थान असलेल्या नलकूप कॉलनीत पोहोचले. त्यांनी सगळ्यांना ताब्यात घेतलं आणि पोलीस ठाण्यात नेलं. पुन्हा असा प्रकार घडणार नाही, असा शब्द अभियंत्यानं दिला. यानंतर अभियंत्याच्या पत्नीचा राग शांत झाला.
तिनं पतीविरोधात तक्रार न करण्याचा निर्णय घेतला आणि प्रकरण निवळलं. यानंतर अभियंता पत्नीला घेऊन सरकारी निवासस्थानी पोहोचला.
हे पण वाचा
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.
- राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.गिरीष महाजन यांचा शिक्षक समन्वय संघ जळगाव,च्या वतीने आभार पर सत्कार.
- रस्त्याने जाणाऱ्या महिलेला भररस्त्यात गाठून माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव नाही तर ठार मारेन; धमकी देणाऱ्या आरोपीला 24 तासाच्या आत अटक.
- निवासी शाळेतून मुलीचा शाळेचा दाखला काढण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्थाचालक व त्यांच्या पत्नीने केलेल्या मारहाणीत मृत्यू.
- अल्पवयीन मुलीशी केली मैत्री,फूस लावून बसविले एक्स्प्रेसमध्ये अन् धावत्या रेल्वेत टॉयलेटमध्ये नेऊन नराधमाने केला लैंगिक अत्याचार.