मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का गेत महाराष्ट्राच्या विधान परिषद सदस्या मनीषा कायंदे यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. पक्षविरोधी कारवायांसाठी शिवसेना (उद्धव) प्रवक्तेपदावरून हकालपट्टी झाल्यानंतर कायंदे यांनी पक्षात प्रवेश केला.
कायंदे या राज्य विधान परिषदेच्या सदस्या म्हणून काम करत आहेत. त्यांचा कार्यकाळ २७ जुलै २०२४ रोजी संपणार आहे. दरम्यान, शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्यांनी कायंदे यांना फटकारले की, संघटनेकडून सर्वकाही मिळूनही त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या वर्षी जूनमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत दोन गट पडले होते. एकनाथ शिंदे आणि इतर ३९ आमदारांनी तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले, परिणामी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.