३० वर्षीय महिलेचा विनयभंग करत सासू सासऱ्यांना केली मारहाण, मारवड पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल…

Spread the love

अमळनेर:- तालुक्यातील पाडसे येथे एकाने ३० वर्षीय महिलेचा विनयभंग करत त्या महिलेच्या सासू सासऱ्यांना तसेच पुतण्याला मारहाण केल्याची घटना दिनांक १६ रोजी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाडसे येथे राहणारी ३० वर्षीय महिला ही दिनांक १६ जून रोजी संध्याकाळी पाळलेल्या कोंबड्या खुरड्यात बंद करत असताना घरासमोर राहणारा संजय शिवाजी पाटील याने अचानक येत पकडुन लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने महिलेने आरडाओरड केली.

त्यावेळी त्या महिलेचा पुतण्या व सासू सासरे हे आले असता पुतण्यास दगडाने मारून दुखापत केली तसेच सासू सासरे यांना देखील चापटबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी संजय याच्या मदतीला जिजाबाई पाटील व रोशनी पाटील यांनी देखील येत दगडाने व चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

सदर महिलेच्या फिर्यादीवरून संजय शिवाजी पाटील, जिजाबाई शिवाजी पाटील, रोशनी सुनील पाटील यांच्या विरुद्ध भादवि कलम ३२४, ३५४, ३२३,५०४, ५०६ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो हे कॉ. किशोर पाटील हे करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार