Viral Video : ८ फुटाचा फणा काढलेला नाग मुंगसाच्या तावडीतून सुटला अन् झोपलेल्या बाळाच्या झोक्यात घुसला नाग;पहा व्हिडिओ

Spread the love

Viral Video : शेतात घर, एका भल्यामोठ्या नागाचे मुंगसासोबत चालू असलेले भांडण अन् त्याच्या तावडीतून सुटून थेट बाळाच्या झोपाळ्यात घुसलेला जवळपास ८ फुटाचा फणा काढलेला नाग. ही थरारक घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.हा व्हिडिओ पाहून आपल्या पायाखालची जमीन सरकेल.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ महाराष्ट्रातील एका खेडेगावातील असून एका शेतातील घरी भलामोठा नाग आला आहे. आधी या नागावर मुंगूस हल्ला करताना दिसत आहे. त्याच्या तावडीतून सुटून हा नाग घराच्या व्हरांड्यात येतो आणि तिथे असलेल्या झोक्यात चढतो. यावेळी त्याने मोठा फणा काढलेला दिसत आहे. हे पाहून महिला ओरडण्याचा आवजही या व्हिडिओमध्ये येत आहे.

बाळाच्या झोपाळ्यात चढून हा नाग झोपाळ्याच्या दोरीने वर चढत जातो आणि वाळायला टाकेलल्या कपड्यांमध्ये घुसतो. तो बराच काळ या दोरीवरच अडकून राहिलेला दिसत आहे. या व्हिडिओमध्ये नाग फणा काढून आक्रमक पवित्र्यात दिसत आहे. सुदैवाने या झोपाळ्यात बाळ नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

दरम्यान, हा थरारक व्हिडिओ पाहून आपलीही झोप उडेल. डॉ. प्रशांत भामरे या ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ग्रामीण भागात घर असलेल्या शेतकऱ्यांनी किंवा नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. साप किंवा सरपटणारे प्राणी अडचणीच्या ठिकाणी दबा धरून बसतात त्यामुळे घराच्या आजूबाजूला स्वच्छता राखली पाहिजे.

हे पण वाचा


टीम झुंजार