जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
स्वत:ला आवडत्या कामात गुंतवून घ्यावे. मनातील चुकीचे विचार काढून टाका. कामाचा ताण वाढला तरी फायद्यात राहाल. चांगला व्यावसायिक लाभ मिळेल. अचानक धनलाभाचे योग आहेत.
वृषभ :-
कामात सुसंगती आल्याने थोडा आराम करू शकाल. कौटुंबिक जबाबदारी अंगावर पडेल. प्रिय व्यक्तीची आवड पूर्ण करावी लागेल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.
मिथुन :-
आपले विचार उत्तमरीत्या मांडाल. नसत्या शंका मनात आणू नका. व्यावसायिक कामात स्पष्टता ठेवावी. वैचारिक गोंधळ घालू नका. हसत-हसत आपले मत मांडावे.
कर्क :-
चोरांपासून सावध राहावे. मित्रांशी पैज लावाल. आपला संयम ढळू देऊ नका. बचत करण्यावर अधिक भर द्यावा. कौटुंबिक गरजा ध्यानात घ्या.
सिंह :-
चर्चेला अधिक वाव द्यावा. तरुण मित्रांच्यात वावराल. नवीन ओळखी होतील. अनुभवी लोकांचा सल्ला विचारात घ्यावा. व्यापारातून चांगला लाभ संभवतो.
कन्या :-
शारीरिक क्षमता तपासून पहावी. काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. जवळचा प्रवास करावा लागेल. कमिशनमधून चांगला लाभ कमवाल. कुटुंबाला पर्याप्त वेळ द्यावा.
तूळ :-
घरातील गोष्टींमध्ये अडकून पडाल. काही गोष्टींबाबत आग्रही राहाल. दीर्घकालीन फायद्याचा विचार कराल. नातेवाईकांवर आपली मते लादू नका. मित्रमंडळींशी जुळवून घ्यावे.
वृश्चिक :-
सकारात्मक धोरण ठेवावे. कौटुंबिक खर्चाचा अधिक विचार कराल. इतरांना दुखवू नका. ताळमेळ साधत कामे करावी लागतील. कौटुंबिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.
धनू :-
मानसिक स्थैर्य जपावे. आलेल्या अनुभवातून काहीतरी शिकण्यास मिळेल. कुटुंबातील सदस्यांचे मत मान्य करावे लागेल. जुन्या कामातून यश मिळेल. जोडीदाराचे कौतुक केले जाईल.
मकर :-
जुन्या विचारात अडकून पडू नका. मनातील निराशा झटकून टाका. आरोग्यात काहीशी सुधारणा होईल. प्रवासात काळजी घ्यावी. घरातील बदलात ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.
कुंभ :-
ध्यानधारणा व योगाचा तुम्हाला फायदा होईल. संघर्षाला विनाकारण हवा देऊ नका. खेळीमेळीने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. बोलण्यातून इतरांना दुखवू नका. घर टापटीप ठेवाल.
मीन :-
उगाचच लहान सहान गोष्टींवरून चिडू नका. कलात्मक काम तुम्हाला आनंद देईल. नव्या संकल्पना फलद्रुप होतील. घरातील लहान मुलांसोबत वेळ घालवाल. आवडत्या छंदाला वेळ काढाल.
हेही वाचलंत का ?
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.
- राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.गिरीष महाजन यांचा शिक्षक समन्वय संघ जळगाव,च्या वतीने आभार पर सत्कार.
- रस्त्याने जाणाऱ्या महिलेला भररस्त्यात गाठून माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव नाही तर ठार मारेन; धमकी देणाऱ्या आरोपीला 24 तासाच्या आत अटक.
- निवासी शाळेतून मुलीचा शाळेचा दाखला काढण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्थाचालक व त्यांच्या पत्नीने केलेल्या मारहाणीत मृत्यू.
- अल्पवयीन मुलीशी केली मैत्री,फूस लावून बसविले एक्स्प्रेसमध्ये अन् धावत्या रेल्वेत टॉयलेटमध्ये नेऊन नराधमाने केला लैंगिक अत्याचार.