माहिती कळविणा-याचे नाव राहणार गोपनीय
जळगाव, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) – जिल्ह्यातील अवैध गौणखनिज उत्खनन, वाहतुक रोखणेसाठी जिल्हास्तरीय विविध विभागांचे समन्वयातून पथकांची निर्मिती करणेत आलेली आहे. सर्व आवश्यक उपाययोजना करुन जिल्ह्यातील अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व आवश्यक ते प्रयत्न करणेत येत आहे. अवैध गौणखनिज साठा, उत्खनन व वाहतुकीची माहिती सजग नागरिकांकडुन जिल्हा प्रशासनाला मिळाल्यास अधिक परिणामकारक कारवाई करणे शक्य होईल. जनतेचे अधिकाधिक सहकार्य मिळवून अवैध गौणखनिजाचे साठा, उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंध करण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस असल्याचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी कळविले आहे.
सामान्य नागरिकांना अवैध गौणखनिज साठा, उत्खनन व वाहतुकीबाबत माहिती जिल्हा प्रशासनाला कळविणेसाठी नागरिकांना 9209284010 हा हेल्पलाईन क्रमांक जिल्हा प्रशासनाद्वारे उपलब्ध करुन देणेत येत आहे. नागरिकांनी 9209284010 या हेल्पलाईन क्रमांकावर अवैध गौणखनिज साठा, उत्खनन व वाहतुकीबाबत बाबत व्हॉटसअपद्वारे घटनेचे छायाचित्र/चलचित्रफित (फोटो/व्हिडीओ), घटनेचे ठिकाण, गुगल लोकेशन कळविल्यास प्राप्त तक्रारीबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरुन तात्काळ कारवाई करणेत येणार आहेत.
अवैध गौणखनिजाबाबत तक्रार करणाऱ्या नागरिकांचे नाव गोपनीय ठेवणेत येईल, तरी नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या उपक्रमाला सहकार्य करणेचे आवाहन करण्याचे आवाहन अमन मित्तल, जिल्हाधिकारी तथा
जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






