अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन केला बलात्कार,मग केले दोघांच्या स्वाधीन त्यांनी ही केला बलात्कार अन् 500 ₹ देऊन बसविले ट्रेनमध्ये.

Spread the love

कॉल गर्लसारखी वागणूक करून बलात्कार करणाऱ्या तिघ नराधमांना पोलिसांनी घेतले ताब्यात, वाचा धक्कादायक बातमी.
लखनऊ : उत्तर प्रदेशातील बरेली येथून एका अल्पवयीन हिंदू मुलीचे अपहरण करून शाह आलम याने उत्तराखंडमधील काशीपूर येथे नेले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिला इरफानच्या ताब्यात देण्यात आले.मग इरफानने त्या मुलीला नदीम कुरेशीच्या ताब्यात दिले. त्यानंतर ५०० रुपये देऊन पीडितेवर बलात्कार करून तिला ट्रेनमध्ये बसवले. दरम्यान पोलीसांनी अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हे प्रकरण बरेली पोलीस स्टेशन मिरगंज भागातील आहे. परौरा गावात राहणाऱ्या १७ वर्षीय पीडित तरुणीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या भावाने दाखल केली होती. एफआयआरमध्ये शाह आलम मुख्य आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. तक्रारकर्त्यानुसार,६ जून रोजी त्याची बहिण तिच्या आईसाठी कपडे घेण्यासाठी दुकानात गेली होती. मात्र ती घरी परतलीच नाही.

दरम्यान नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भादंवि कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी पीडितेला ११ जून २०२३ रोजी काशीपूर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले आहे. यानंतर शाह आलम, इरफान आणि नदीम कुरेशी यांना अटक करण्यात आली. पोलिसांच्या चौकशीदरम्यान पीडितेने सांगितले की, शाह आलम आणि त्याचे दोन साथीदार तिच्याशी कॉल गर्लसारखे वागले.शाह आलमने पीडितेचे अपहरण केल्यानंतर उत्तराखंडमधील काशीपूरमध्ये घेऊन गेला.

तिथे त्यांने भाड्याच्या घरात पीडितेवर बलात्कार केला. काही वेळाने शाह आलम तिथून निघून गेला आणि इरफानला खोलीत पाठवले. इरफान हा शाह आलमचा शेजारी आहे. त्यानंतर इरफानने अल्पवयीन मुलीवरही धमकी देऊन बलात्कार केला. बलात्कारानंतर इरफानने पीडितेला नदीमच्या ताब्यात दिले. नदीमने पीडितेला नोएडा येथे आणले आणि एका हॉटेलमध्ये ठेवून तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर नदीमने पीडितेला ५०० रुपये दिले आणि काशीपूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसवले.त्यानंतर पीडिता काशीपूर येथे आली आणि तिथूनच पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले.

अटकेनंतर तिन्ही आरोपींवर आयपीसी ३६६, सामूहिक बलात्काराचे कलम ३७६ (२) एन आणि पोक्सो कायद्याच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार, मुख्य आरोपी शाह आलमवर यांच्यावर ५ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खून , अपहरण, जुगार अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.दरम्यान या प्रकरणावर पीडितेच्या भावाने सांगितले की, शाह आलम हा सुमारे ५० वर्षांचा असून तो गावप्रमुखाचा नातेवाईक
आहे. त्याच्यावर अल्पवयीन पीडितेचे दीर्घकाळ ब्रेनवॉश केल्याचाही आरोप आहे. शाह आलमने याआधीही गावातील आणखी एका हिंदू मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मात्र त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली नाही.

टीम झुंजार