Viral Video: लग्न असो किंवा पार्टी, भोजपुरी गाण्यांचे आकर्षण हे असतेच. काहींना तर भोजपुरी गाण्यांचा अर्थच कळत नाही, पण त्याच्या उथळ म्युझिकमुळे काही का होईना कोणीही नाचू लागेल!
विशेष म्हणजे, पवन सिंग यांचे “लॉलीपॉप लागेलू” हे गाणे जिथे वाजते तिथे रंगत बनते. तुम्हीदेखील या गाण्यावर कधी ना कधी डान्स केला असेलच.
याच गाण्याने ऐन मंडपात ‘नवविवाहित जोडप्या’ना देखील नाचवले आहे. त्यांचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नवरा आणि नवरी दोघेही एकमेकांना वरमाला घातल्यानंतर स्टेजवरच नाचू लागल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचे डान्स स्टेप्स इतके भन्नाट आहेत की ते हा जोडा एकमेकांना चांगलाच शोभून दिसेल असे पाहणाऱ्यांचे मत झाले आहे. सोशल मिडियावर तर या दोघांचा डान्स पाहून यूजर्स 36 पैकी 36 गुण मिळाले अशी प्रतिक्रिया देत आहेत.
तुम्ही देखील हा व्हिडिओ पाहून त्याचा आनंद घेऊ शकता-
हा व्हिडिओ इंस्टाग्राम वापरकर्त्याने ‘सुमित’ (@sumitchauhanwsingh) ने 13 मे रोजी पोस्ट केला होता, ज्याने आतापर्यंत 1.8 दशलक्ष व्ह्यूज आणि 76,000 हून अधिक लाईक्स मिळवले आहेत
हे पण वाचा
- Viral Video: एक तरुण स्टंटबाजी करण्यासाठी धावत्या लोकल ट्रेनच्या छतावर चढला अन् अचानक पुढं भयंकर घडलं; पहा व्हिडिओ
- रस्त्यावरील विजेचा खांब बाजुला करा,या मागणीसाठी एका नागरिकाने चक्क विजेचा खांबावरच खाट बांधून केले उपोषण
- अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्यांच्या खून करणाऱ्या आई व तिच्या प्रियकरास जन्मठेप.
- “माझा मृत्यू माझ्या पत्नीच्या छळामुळे झाला” असे माझ्या शवपेटीवर लिहा ही माझी शेवटची इच्छा आहे अशी सुसाईट नोट लिहून तरुणाने केली आत्महत्या.
- एक तरुण नोकरी गेल्याने निराश होऊन कंटाळून आपल्या देशात येण्यासाठी निघाला अचानक त्याच्या नशिबाची बंद कवाडे उघडली अन् तो झाला 13 कोटींचा मालक