बाहेर आलेलं पोट फ्लॅट करण्यासाठी बेस्ट आहेत ही 3 योगासने, करून बघाच!

Spread the love

International Yoga Day 2023 : अलिकडे वाढलेली लठ्ठपणाची समस्याही योगाच्या माध्यमातून दूर केली जाऊ शकते. अशात आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी तीन आसने सांगणार आहोत.

International Yoga Day 2023 : जगभरात 21 जून रोजी इंटरनॅशनल योगा डे साजरा केला जातो. अनेकांनी दावा केला आहे की, तुम्ही नियमितपणे योगाभ्यास केला तर तुम्हाला अनेक फायदे मिळतात. याने शारीरिक व मानसिक आरोग्य चांगलं राहतं. अशात अलिकडे वाढलेली लठ्ठपणाची समस्याही योगाच्या माध्यमातून दूर केली जाऊ शकते. अशात आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी तीन आसने सांगणार आहोत.

त्रिकोणासन, सर्वांगासन आणि वीरभद्रासन ही तीन आसने तुम्ही जर नियमितपणे केली तर तुमच्या पोटावरील चरबी तर कमी होईल, सोबतच कंबरेच्या आजूबाजूला जमा झालेली चरबी सुद्धा कमी होईल.

त्रिकोणासन

Pic for Google

जर तुमच्या पोटावर चरबी जमा झाली असेल तर त्रिकोणासन तुमच्यासाठी फार फायदेशीर ठरू शकतं. तसेच या आसनामुळे पचनक्रियाही सुधारते. सोबतच पोट आणि कंबरेच्या आजूबाजूला जमा झालेली चरबी कमी करण्यासही मदत मिळते. या आसनामुळे शरीरात ब्लड फ्लो सुरळीत होतो.

सर्वांगासन

pic for Google

वजन कमी करण्यासाठी उपाय शोधत असाल तर सर्वांगासन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. या आसनामुळेही पचन सुधारतं आणि शरीराला मजबुती मिळते. मेटाबॉलिज्म मजबूत होतं याचा फायदा तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळतो. तसेच या आसनामुळे मांसपेशी आणि पाय सुद्धा मजबूत होतात. सोबतच श्वसन प्रक्रियाही सुधारते.

वीरभद्रासन

pic for Google

जर तुम्हाला मांड्या आणि खांडे टोन करायचे असेल तर हे वीरभद्रासन तुम्हाला मदत करेल. वीरभद्रासन केल्याने कंबरेच्या खालचा भाग, पाय आणि खांदे टोन करण्यासाठी फायदा मिळतो. तसेच याने पोटावरील चरबी सुद्धा कमी होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार