गुरांच्या अवैध वाहतुकीवर एरंडोल पोलिसांची कारवाई, ४ बैलांसह वाहन जप्त. दोघ आरोपी फरार

Spread the love

एरंडोल :- पारोळा पोलीस स्टेशन हून वायरलेसवर माहिती आली की पाढऱ्या रंगाची पिक अप गाडी भरधाव वेगात येत आहे त्यामध्ये चोरीचे गुरे आहेत म्हणून धरणगाव हाय-वे चौफुली वर कर्तव्यावर असतांना पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत प्रकाश पाटील यांना पेट्रोल पंपाच्या बाजूस असलेल्या कमल लाॅन्स मंगल कार्यालयापुढे काही अंतरावर पिक अप गाडीच्या पुढे पोलीस गाडी आडवी लावून पिक अप गाडी थांबवली रात्रीची वेळ असल्यामुळे अंधाराचा फायदा घेत गाडीचा ड्रायव्हर व कंडक्टर गाडी सोडून पडून गेले या गाडी मध्ये २० हजार रूपये किमतीच्या ४ बैलांची अवैध वाहतुक करून आढळुन आले.

पांढऱ्या रंगाच्या पिकप यांना सोडून गेलेले कंडक्टर ड्रायव्हरमुळे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पाटील हेमंत धोंडगे त्यांनी या गाडीत पोलीस स्थानकात आणून त्यामध्ये असलेले चार बैलांना औषधोपचार करून समर्पण गोशाळा येथे उतरवण्यात आले. याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप गोराडे यांना मिळताच ते तात्काळ पोलीस स्थानकात दाखल झाले

याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन ला भाग६ गु.र.नंबर कलम महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुुधारणा) अधीनियम १९९५ चे कलम ५अ(१)प्रमाणे प्राणीक्लेश प्रतीबंधक कायदा १९६० चे कलम ११(१)(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून ड्रायव्हर व क्लिनर या दोन्ही आरोपीं हे फरार झाले आहेत. पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल विलास पाटील व संदीप पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार