कोल्हापूर :- पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने दोघांनी इमारतीवरून उड्या मारल्या, त्यात साहिल मायकेल मिणेकर याचा जागीच मृत्यू झाला तर दत्तात्रय देवकुळे गंभीर जखमी झाला आहे.
कोल्हापूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इमारतीमध्ये जुगार खेळत असलेल्या दोन मुलांनी इमारतीवरुन उडी घेतली आहे. पोलिसांनी या इमारतीवर छापेमारी केली. त्यावेळी भीतीने दोन तरुणांंनी खाली उडी घेतली. यात एकाचा जागीच मृत्यू झालाय.
इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सहाजण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तेथे छापा टाकला. पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने दोघांनी इमारतीवरून उड्या मारल्या, त्यात साहिल मायकेल मिणेकर याचा जागीच मृत्यू झाला तर दत्तात्रय देवकुळे गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्रनगर इथल्या एका दुमजली इमारतीत सहाजण जुगार खेळत असल्याची माहिती रविवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास पोलिसांना मिळाली. पोलिस ११ वाजण्याच्या सुमारास तेथे पोहोचले. पोलीस छापेमारी करत आहेत हे समजताच साहिल आणि दत्तात्रय हे दोघेही प्रचंड खाबरले. आपल्यावर कारवाई होणार, परिसरात आपलं नाव खराब होणार, आपण आपल्या आई बाबांना काय उत्तर देणार असे प्रश्न त्या क्षणी या दोघांच्या मनात आले.
कारवाईच्या भीतीने साहिल आणि दत्तात्रय दोघांनीही इमारतीवरुन उड्या मारल्या. इमारतीवरुन (Building) उडी घेताच साहिल खाली असलेल्या दगडावर आदळला. डोक्यावर दगड लागल्याने तो पुरता रक्तबंबाळ झाला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झालाय.
सदर घटनेनंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये आणण्यात आला आहे. तर दत्तात्रय याने देखील इमारतीवरुन उडी घेतल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. साहिल हा खासगी कंपनीत नोकरी करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
हे पण वाचा
- लग्न होत नाही म्हणून एजेंटला दिले 5 लाख रुपये, सोन दिल लग्न लागलं अन् दुसऱ्याच दिवशी नवरी फरार, 5 जणांन विरोधात गुन्हा दाखल.
- उसनवार दिलेले अडीच लाख रुपये दे, किंवा माझ्याशी लग्न कर असा तगादा लावणाऱ्या महिलेच्या मित्रांने केली हत्या.
- जळगाव एमआयडीसी पोलिसांनी अट्टल दुचाकी चोरास केले जेरबंद; साडे सात लाखांच्या 15 मोटरसायकली जप्त
- आमदार अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रा.वसंत हंकारे यांच्या एरंडोल येथील व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद
- पारोळा बायपास महामार्गावर गॅसचा टँकर कलंडला:.…..प्रशासनाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला…..