शासन आपल्या दारी अंतर्गत 534 शिधापत्रिकांचे वाटप.

Spread the love

एरंडोल :-शासनाने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी सुरु केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत १७४ लाभार्थ्याना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सुचिता चव्हाण
यांनी दिली.तहसीलदार कार्यालयातर्फे शासन आपल्या दारी योजना पूर्णपणे यशस्वी करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.तहसीलदार कार्यालयातर्फे शासन आपल्या दारी योजनेंतर्गत १७४ नवीन शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.

यामध्ये २५ आदिवासी लाभार्थ्यांचा समावेश आहे.तसेच १६३ दुय्यम शिधापत्रिका,१०३ नवीन नावांचा शिधापत्रिकेत समावेश करणे व ९५ शिधा पत्रिकेत नावे कमी करणे अशा एकूण ५३५ शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.पुरवठा निरीक्षक संदीप निळे,अव्वल कारकून नंदकिशोर वाघ यांचेसह पुरवठा विभागातील कर्मचा-यांनी यासाठी सहकार्य केले.तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात आदिवासी बांधवाना शिधा पत्रिकांचे वाटप करण्यात आले.

यावेळी नायब तहसीलदार दिलीप पाटील यांचेसह कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.तहसीलदार कार्यालयामार्फत यापूर्वी देखील संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ योजना,इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना यासारख्या शासकीय योजनांची ५५४ प्रकरणे मंजूर करून मंजुरीचे पत्र लाभार्थ्याना देण्यात आले आहेत.

आमदार चिमणराव पाटील यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सभागृहात झालेल्या सर्व शासकीय अधिकारी व विभागप्रमुख यांच्या बैठकीत ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम यशस्वी करण्याबाबत नियोजन करण्यात आले होते.

हे पण वाचा

टीम झुंजार