Viral Video :रस्त्यांवर स्टंट करीत असताना अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये बाईक चालक आहेत किंवा कार चालक सुध्दा आहेत. विशेष म्हणजे गाडीच्या आतून तोंड बाहेर काढून अनेकांनी स्टंट केले आहेत. त्याचबरोबर त्यांचे व्हिडीओ सुध्दा चांगलेचं व्हायरल झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. परंतु मागच्या काही दिवसांपासून स्टंटबाज तरुणांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेचं व्हायरल झाले आहेत. गाजियाबादमधील एक व्हिडीओ मागच्या दोन दिवसांपासून सगळीकडे चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक मुलीचा तरुणाचे बाईकच्या टाकीवर बसवले आहे.
स्टंटबाजी का व्हिडीओ व्हायरल….
हा व्हिडीओ नॅशनल हायवे-९ चा असून दोन दिवसापूर्वीचा असल्याचं एका वेबसाईटनं म्हटलं आहे. रात्री साडेबारा वाजता एका बाईकवरती एक तरुण स्टंट करीत आहे. त्यावेळी बाईकच्या टाकीवरती एक तरुणी उलट बाजूला तोंड करुन बसली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओ दोघांचे चेहरे नीट दिसत नाहीत. तो तरुण वेगाने बाईक चालवत आहे, त्याचवेळी ती तरुणी त्याच्याकडे तोंड करुन बसली आहे. या व्हिडीओची पोलिसांनी चौकशी करायला हवी.
ट्रॅफिक पोलिसांनी कारवाई करण्याचे…
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडे गेला आहे. त्यामध्ये तरुण आणि तरुणीने हेल्मेट घातलेलं नाही. सीसीटिव्हीचा आधार घेऊन या दोघांना शोधण्याचं काम सुरु आहे. मागच्या काही दिवसांमध्ये स्टंटबाजीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अधिकतर गोष्टींमध्ये पोलिसांनी कारवाई सुद्धा केली आहे. त्यानंतर सुध्दा स्टंटबाज अशा पद्धतीने स्टंट करीत असल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी पुन्हा वाढली आहे.