जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
आजचा दिवस आपल्यासाठी चांगला असेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. सढळ हाताने मदत कराल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. आवडते पदार्थ खाल.
वृषभ :-
वाणी सौम्य ठेवून वागाल. मैत्रीपूर्ण संबंध जपावेत. कामातून मान-प्रतिष्ठा लाभेल. सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. स्थावरच्या व्यवहारातून लाभ संभवतो.
मिथुन :-
स्थावरचे व्यवहार सुसह्य होतील. कागदपत्रांवर सही करतांना सावधानता बाळगावी. भागीदारीच्या कामात सक्रिय व्हाल. नवीन संबंधातून क्षणिक सुख मिळेल. स्वत: विषयक चुकीच्या कल्पना मनातून काढून टाका.
कर्क :-
जोडीदाराशी विसंवादाची शक्यता. तुमच्यातील अधीरता वाढेल. आपले विचार जवळच्यावर लादण्याचा प्रयत्न कराल. मनाजोगी खरेदी कराल. वरिष्ठांना खुश ठेवावे
सिंह :-
घरातील सुख सोयींकडे विशेष लक्ष द्याल. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी राहतील. वरिष्ठांच्या सल्ल्याने वागावे. अभ्यासू लोकांचा सहवास लाभेल. नवीन विचार जाणून घ्याल.
कन्या :-
फायदा साधण्याकडे विशेष लक्ष राहील. गृहसौख्याला अधिक महत्व द्यावे. मतभिन्नता दर्शवू नका. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. अपचनाचा त्रास जाणवेल.
तूळ :-
दूरस्थ व्यावसायिक कामात गती येईल. जवळचा प्रवास घडेल. हातातील कामात यश येईल. उष्णतेचे त्रास संभवतात. तिखट व तामसी पदार्थ खाल.
वृश्चिक :-
कोणतेही साहस करतांना सावधानता बाळगावी. हट्टीपणा सोडून लवचिक व्हावे लागेल. कौटुंबिक प्रश्न सतावतील. नातेवाईकांना नाराज करू नका. भागीदारीतून लाभ उठवाल.
धनू :-
जमिनीच्या कामात गती येईल. जोडीदाराचे कौतुक केले जाईल. व्यवहार कुशलता दाखवावी लागेल. समर्पक भावना दर्शवावी लागेल. वैचारिक दृष्टीकोन बदलून पहावा.
मकर :-
सहकार्यांची वेळेवर मदत मिळेल. कामात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. तुमची भावनाशीलता प्रियजनांच्या लक्षात येईल. मनातील संभ्रम दूर सारावा. व्यावसायिक कामात अधिक वेळ द्यावा लागेल.
कुंभ :-
नवीन आव्हाने जाणून घ्यावीत. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागू शकते. बोलण्याच्या भरात जबाबदारी उचलाल. बाग कामात मन रमेल. अनावश्यक खर्च टाळावा.
मीन :-
इतरांना आपले मत मान्य करायला लावाल. दिवसभर कामात व्यस्त राहाल. सारासार विचारांवर भर द्यावा. स्वतंत्र विचारांची कास धराल. काही कामे अधिक कस पाहतील.
हेही वाचलंत का ?
- भाजीपाला घेऊन घरी जात असलेल्या महिलेस मारहाण करून गळ्यातील मंगळसूत्र अन् मोबाइल पतीनेच पळवले, काय आहे प्रकरण वाचा.
- एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे चौदा वर्षीय अल्पवयीन बालकाची गळा चिरून हत्या; संतप्त ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन.
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.