तिच्याशी असलेले अनैतिक संबंध,घरात पत्नीसोबत रोजची भांडणे, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल.
पंढरपूर :- महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार पंढरपूर इथे समोर आलेला असून बलात्काराची केस मिटवून घेण्यासाठी एक महिला आणि एक पुरुष या दोघांनी घराचा अर्धा हिस्सा आणि दहा लाख रुपयांची मागणी केल्यानंतर हतबल झालेल्या एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. रविवारी ही घटना सकाळी बाराच्या सुमारास घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, ज्ञानेश्वर उर्फ माऊली सोपान हजारे असे मयत तरुणाचे नाव असून त्याचे एका महिलेसोबत दहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. महिलेने त्यानंतर वितुष्ट आल्यानंतर ज्ञानेश्वर याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला त्यानंतर तो जामीनावर सुटून बाहेर आला आणि पुन्हा त्यांच्यात अनैतिक संबंध सुरू झालेले होते. महिला त्याच्यावरील बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी त्याला सतत पैसे मागत होती आणि पैसे दिले नाही तर तुझ्यावर पुन्हा गुन्हा दाखल करून तुला जेलमध्ये पाठवीन अशी देखील धमकी देत होती.
दुसरीकडे ज्ञानेश्वर यांच्या घरात त्याच्या पत्नीसोबत देखील त्याची भांडणे सुरू झालेली होती. मागील दोन महिन्यांपासून ज्ञानेश्वर यांच्या प्रेयसीचे तिसऱ्याच एका पुरुषासोबत प्रेम संबंध जोडलेले होते आणि ते दोघे मिळून ज्ञानेश्वर याला राहत्या घरातील अर्धा हिस्सा आणि दहा लाख रुपये पैशाची मागणी करत होते. पैसे दिले नाही तर तुझ्या विरोधात पुन्हा गुन्हा दाखल करेल अशी धमकी देत असल्याने ज्ञानेश्वर यांनी टोकाचे पाऊल उचलले असे त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






