अहमदाबाद :- पश्चिमेला राहणाऱ्या एका १३ वर्षीय मुलीने जन्मदात्या आई-वडिलांनाच ठार मारण्यासाठी कट रचल्याचा धक्कादायक आणि मन सुन्न करणारा प्रकार उघड झाला आहे. पोटच्या अल्पवयीन मुलीने रचलेला ‘प्लान’ उघड झाल्यानंतर मात्या-पित्यासह सर्वच हादरून गेले आहेत. गुजरातमधील अहमदाबादमध्ये हा धक्कादायक आणि मन सुन्न करणारा प्रकार उघड झाला आहे. पोटच्या १३ वर्षांच्या मुलीनंच आपल्या मात्या-पित्याच्या हत्येचा कट रचला होता. ही बाब लक्षात आल्यानंतर पालकांचं काळीज अक्षरशः पिळवटून निघालं. त्यांनी गुजरात पोलिसांच्या ‘अभयम’ हेल्पलाइनवर फोन केला आणि मदतीची मागणी केली.
पोलिसांनी समुपदेशन केल्यानंतर कारण समोर आले. आईने मुलीकडील मोबाइल काढून घेतला होता. त्यामुळे ती नाराज होती. या कृत्यामागे पालकांना इजा पोहोचवण्याचा तिचा हेतू असल्याची बाब समोर आली.मनात काय चाललं होतं?
अहमदाबाद पश्चिमेकडे राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेला घरातील बाथरूममध्ये फरशीवर फिनाइल दिसून यायचा. याशिवाय साखरेच्या डब्यात किटकनाशक पावडर आढळून आली होती. सुरुवातीला या महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले. पण सातत्याने हा प्रकार घडत होता.
त्यानंतर हे आपल्या १३ वर्षीय मुलीचेच कारस्थान आहे, असे लक्षात आले. मुलीनेही तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. काही दिवस त्याकडे दुर्लक्ष केले.
पण काहीही सुधारणा होत नसल्याने महिलेने अखेर अभयम हेल्पलाइनवर फोन करून मदतीची मागणी केली.’अभयम’वर फोन केल्यानंतर तेथील समुपदेशक महिलेने मुलीकडून सर्व घटना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी धक्कादायक बाब समोर आली. एक १३ वर्षीय मुलगी इतका क्रूर विचार कसा काय करू शकते, या विचारानेच त्यांनाही हादरा बसला.आपल्या आई-वडिलांना इजा पोहोचवायचा तिचा उद्देश होता.
त्यांनी किटकनाशक मिसळलेली साखर खावी किंवा बाथरूममधल्या फरशीवरून घसरून पडून डोक्याला मार लागावा, यासाठी तिने हे कृत्य केले. तिच्या आईने तिच्याकडील मोबाइल काढून घेतला होता. तो परत देण्यास नकार दिला होता. तेव्हापासून ही मुलगी हिंसक झाली होती, असे समुपदेशक महिलेने सांगितले.
लग्नानंतर १३ वर्षांनी मुलगी झाली, पण…
समुपदेशक महिलेने सांगितले की, मुलगी संपूर्ण दिवस आपल्या मित्रांसोबत मोबाइलवर चॅटिंग करत असे. तसेच सोशल मीडियावर रील्स आणि पोस्ट बघत असायची. तिच्या अभ्यासावर परिणाम झाला होता. त्यामुळे तिच्याकडील मोबाइल काढून घेतला होता. पण ही गोष्ट इथपर्यंत पोहोचेल याचा विचारही कधी केला नव्हता.या दाम्पत्याला लग्नानंतर १३ वर्षांनी मुलगी झाली. त्यामुळे तिचे सर्व लाड पुरवले. तिच्या पालनपोषणात कोणतीही कसर सोडली नाही. या अतिप्रेमाचा परिणाम असा होईल याचा विचारही केला नव्हता, असे या मात्या-पित्याचे म्हणणे आहे.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.