जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
कामात नवीन धोरणांची अंमलबजावणी कराल. आळस झटकून कामाला लागावे लागेल. आज कामाचा व्याप वाढता राहील. चुकीच्या संगतीत अडकू नका. कामात स्थैर्य आणावे लागेल.
वृषभ :-
दूरच्या प्रवासाचा योग येऊ शकतो. वडीलांना मदत करावी लागेल. तुमच्यातील कलात्मक दृष्टीकोन वाढीस लागेल. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा लागेल. स्वभावात हेकेखोरपणा वाढू शकतो.
मिथुन :-
आपले विचार भरकटू देऊ नका. हजरजबाबीपणे उत्तरे द्याल. गप्पांमधून स्वत:चे मत खरे करून दाखवाल. काही आनंद क्षणिक असतील. आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल.
कर्क :-
जोडीदाराची साथ आवश्यक राहील. शांतपणे गोष्टी जुळवून आणाव्यात. चुकीच्या लोकांच्यात वावरू नका. संपर्कातील लोकांच्यात आपली माणसे ओळखा. आरोग्याची काळजी घ्यावी.
सिंह :-
हातात नवीन अधिकार येतील. कामातून चांगले समाधान मिळेल. हाताखालील लोक विश्वासू भेटतील. कामाला अपेक्षित गती येईल. आजचा दिवस चांगला जाईल.
कन्या :-
मनातील निराशा झटकावी लागेल. उत्साहाला खतपाणी घालावे लागेल. भागीदाराशी मतभेदाची शक्यता. नातेवाईकांचा गैरसमज दूर करावा लागेल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल.
तूळ :-
अकारण नैराश्य येऊ शकते. तुमच्यातील चैतन्य जागृत ठेवावे. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी. वारसाहक्काच्या कामातून लाभ संभवतो.
वृश्चिक :-
तुमचा आत्मविश्वास वाढेल. नवीन स्फूर्तीने कामे हाती घ्याल. कामाची व्यापकता वाढेल. दिवस भटकंतीत जाईल. जोडीदार तुमच्यावर खुश राहील.
धनू :-
आर्थिक कामात सावधानता बाळगावी. काही कौटुंबिक चिंता सतावतील. अति विचारात भरकटू नका. घरगुती वातावरण शांत ठेवावे लागेल. दोन पाऊले मागे घेण्यास हरकत नाही.
मकर :-
वैचारिक आंदोलने जाणवतील. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. जोडीदाराशी सल्लामसलत करावी. छंद जोपासण्यात वेळ घालवा. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.
कुंभ :-
मानसिक चांचल्य जाणवेल. वैचारिक दिशा बदलून पहावी. बोलताना भडक शब्दांचा वापर टाळावा. आर्थिक कामे जपून करावीत. कर्जाची प्रकरणे तूर्तास टाळावीत.
मीन :-
बौद्धिक कुशलतेवर कामे कराल. व्यापारातून चांगला आर्थिक लाभ होईल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. आवडते साहित्य वाचायला मिळेल.
हेही वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






