ज्वारी खरेदी करताना शेतकऱ्यांना पूर्ण सहकार्य करा आ.चिमणरावजी पाटील,एरंडोल शेतकी संघ येथे ज्वारी खरेदीचे काटा पूजन.

Spread the love

एरंडोल :- ज्वारी खरेदी करताना शेतकऱ्यांचा पूर्ण माल मोजण्यात यावा मोजा त्यात कोणत्याही प्रकारची अडचण येता कामा नये असे आमदार चिमणराव पाटील यांनी काटा पूजन प्रसंगी व्यक्त केले
एरंडोल शेतकरी संघाचा येथे ज्वारी खरेदी केंद्राचे काटा पूजन आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले याप्रसंगी बोलताना आमदार चिमणराव पाटील म्हणाले की शेतकऱ्यांचा पूर्णमाल मोजला गेला पाहिजे ३० शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली असून ज्वारीला दर भाव २९७०/ रुपये क्विंटल दिला जाणार आहे मोजताना कोणत्याही प्रकारची अडचण शेतकऱ्यांना येता कामा नये.

मुदतीच्या आत सुट्टीच्या दिवशीही शेतकऱ्यांचा माल मोजला गेला पाहिजे त्यांना कोणत्याही प्रकारची अडचणीचा कामा नये असे स्पष्ट सुचना आ. चिमणराव पाटील यांनी या प्रसंगी कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिले त्यानंतर आ. चिमणराव पाटील यांच्या हस्ते काटा पूजन करण्यात आले सुरुवातीला आ. चिमणराव पाटील यांचे शेतकी सघ संचालक प्रकाश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकी सघ संचालक ज्ञानेश्वर महाजन ,रवींद्र जाधव,गजानन पाटील,पवन पाटील,पिंटू पाटील, जिल्हा शिवसेना प्रमुख वासुदेव पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी माजी संचालक विजय महाजन पंचायत समितीचे माजी सभापती अनिल महाजन,

पुरवठा निरीक्षक संदीप निळे ,जावेद मुजावर,विठ्ठल आंधळे, बाजार समितीचे राजेंद्र पाटील पाठक सर प्रवराज पाटील, गुड्डू जोहरी, यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेतकी सघ संचालक रवींद्र जाधव यांनी तर प्रस्तावना मॅनेजर अरुण पाटील यांनी केले आभार देविदास पाटील यांनी मानले यशस्वीतेसाठी राजेंद्र पाटील जगदीश पाटील रोहित चौधरी यांनी सहकार्य केले.

हे पण वाचा

टीम झुंजार