१९ वर्षीय विवाहिता बहिणीच्या घरी जाण्यासाठी रेल्वेने आली, स्टेशनवर दोन नराधमांनी तिला जबरदस्तीने पळवून नेले,व आळीपाळीने केला तिच्यावर बलात्कार .

Spread the love

नाशिक : गुजरातहून नाशिकला बहिणीच्या घरी जाण्यासाठी रेल्वेने आलेल्या एका १९ वर्षीय विवाहितेला नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरून जबरदस्तीने पळवून नेऊन दोघा नराधमांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. ही खळबळजनक घटना गुरुवारी (२२ जून) मध्यरात्री अडीच ते सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान चेहेडी पंपिंग स्टेशन भागातील महापालिकेच्या सीएनजी पंपापाठीमागील मोकळ्या जागेत घडली. या घटनेतील पीडितेला बलात्कारानंतर संशयित नराधमांनी या घटनेची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी देत मारहाण करून घटनास्थळावरून पोबारा केला.

कुणाल शिवाजी पवार (रा. भगवा चौक, चेहेडी पंपिंग स्टेशन) आणि प्रकाश सोपान मुंडे (रा. एकलहरे रोड)Ḥ अशी या घटनेतील संशयित नराधमांची नावे असून, पोलिसांनी त्यांना जेरबंद केले आहे. या दोघा संशयितांपैकी कुणाल पवार हा रेल्वे स्टेशनवरील पाणी विक्रेता असून, प्रकाश मुंडे हा रिक्षाचालक आहे. या घटनेतील पीडित महिला विवाहित असून, पतीपासून विभक्त राहते. सध्या ती आंबावाडी, रेवानगर, (ता. नवसारी) येथे आईसोबत राहते. बुधवारी आईसोबत भांडण झाल्याने ती रागात घर सोडून नाशिक येथे राहणाऱ्या बहिणीकडे येण्यासाठी  मध्यरात्री अडीच वाजता नाशिकरोड रेल्वे स्टेशनला आली.

एका महिला प्रवाशाच्या फोनवरून तिने नाशिकमध्ये राहणाऱ्या बहिणीला आपण नाशिकरोड रेल्वे स्टेशनला आल्याचे कळविले. मात्र, सकाळपर्यंत तू रेल्वे स्टेशनला थांब, सकाळी तुला घ्यायला येते, असे बहिणीने सांगितल्याने पीडिता फलाट क्रमांक दोनवर बसून होती.यावेळी संशयित कुणाल पवार याने तिची विचारपूस करून काही खायचे का, असा आग्रह धरत एक वडापाव दिला. वडापाव खाल्ल्यावर पीडितेला चक्कर आली. संशयिताने कुठे जायचे अशी विचारणा केली. बहिणीकडे जायचे आहे, असे पीडितेने सांगितल्यावर तुला सोडून देतो असे म्हणून रेल्वे स्टेशन बाहेर आणले.

एका मेडिकल दुकानातून संशयिताने काहीतरी विकत घेत पुढे थांबलेल्या प्रकाश मुंडे याच्या रिक्षातच काहीतरी औषध पाजले. निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.वॉचमनने पोलिसांना दिली माहिती…….संशयितांना धक्का देऊन पीडितेने घटनास्थळावरून पळ काढत स्वतःची सुटका करून घेतली. जवळच्याच एका इमारतीच्या कंपाउंडमध्ये गेल्यावर मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर तिथे आलेल्या इमारतीच्या वॉचमनला तिने घडल्या प्रकाराची माहिती दिली. वॉचमनकडून माहिती मिळताच नाशिकरोड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पीडितेला ताब्यात घेतले.

हे पण वाचा

टीम झुंजार