अदिवासी टायगर सेनेचे सहकार्य.
एरंडोल :- राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत तहसीलदार कार्यालयाच्यावतीने व आदिवासी टायगर सेनेच्या सहकार्याने आडगाव
(ता.एरंडोल) येथे २३ अदिवासी बांधवांना शिधापत्रिका आणि परिसरातील ४५० आदिवासींना जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले.प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार सुचिता चव्हाण, अदिवासी विकास विभागाचे प्रकाश पाटील,अदिवासी टायगर सेनेचे प्रवक्ते पंढरीनाथ मोरे यांचेसह उपस्थित
मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्याना शिधापत्रिका आणि जातीचे दाखले वाटप करण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांनी शासन आपल्या दारी या उपक्रमाबाबत ग्रामस्थांना माहिती दिली.शासन आपल्या दारी उपक्रमामुळे
लाभार्थ्यांची गैरसोय दूर होणार असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी तहसीलदार कार्यालयाच्यावतीने शासन आपल्या दारी या उपक्रमाची प्रबाविपणे अंमलबजावणी करून योजना यशस्वी करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.अदिवासी विकास विभागाचे
प्रकाश पाटील यांनी शासनाच्या अदिवासी समाजासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी अदिवासी टायगर सेनेचे प्रवक्ते पंढरीनाथ मोरे,दिपाली सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद पाटील यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमास सरपंच सुनील भिल,अदिवासी टायगर सेनेचे जिल्हासचिव सुनील सोनवणे,संतोष सोनवणे, संभाजी पवार,उत्तम भिल,दिनेश पावरा,गोकुळ भिल, सोनू भिल,गोकुळ महाराज,माजी उपसरपंच जिभाऊ मोरे,ग्रामपंचायात सदस्य प्रवीण पाटील,युवराज साबळे, भरत पाटील यांचेसह परिसरातील अदिवासी,भिल्ल समाज बांधव व महिला उपस्थित होत्या.ग्रामपंचायत आणि अदिवासी टायगर सेनेच्यावतीने प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड,तहसीलदार सुचिता चव्हाण, अदिवासी विकास विभागाचे प्रकाश पाटील यांचेसह उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून अदिवासी समाजबांधवांना जातीचे दाखले व शिधा पत्रिका उपलब्ध झाल्यामुळे लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
हे पण वाचा
- Viral Video: एक तरुण स्टंटबाजी करण्यासाठी धावत्या लोकल ट्रेनच्या छतावर चढला अन् अचानक पुढं भयंकर घडलं; पहा व्हिडिओ
- रस्त्यावरील विजेचा खांब बाजुला करा,या मागणीसाठी एका नागरिकाने चक्क विजेचा खांबावरच खाट बांधून केले उपोषण
- अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्यांच्या खून करणाऱ्या आई व तिच्या प्रियकरास जन्मठेप.
- “माझा मृत्यू माझ्या पत्नीच्या छळामुळे झाला” असे माझ्या शवपेटीवर लिहा ही माझी शेवटची इच्छा आहे अशी सुसाईट नोट लिहून तरुणाने केली आत्महत्या.
- एक तरुण नोकरी गेल्याने निराश होऊन कंटाळून आपल्या देशात येण्यासाठी निघाला अचानक त्याच्या नशिबाची बंद कवाडे उघडली अन् तो झाला 13 कोटींचा मालक