अमरावती :- महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर इथे समोर आलेला असून एका महिलेला पुत्रप्राप्तीचा मोह दाखवत पूजा करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने तिचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. आरोपीने पूजा करण्याच्या नावावर ७० हजार रुपये देखील उकळलेले असून सात जून रोजी दर्यापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना समोर आलेली आहे.
आरोपी भोंदू बाबाला पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे.उपलब्ध माहितीनुसार, संतोष गजानन बावणे ( राहणार कुकसा दर्यापूर ) असे अटक केलेल्या भोंदू बाबाचे नाव असून संतोष याने आपल्या अंगात शेषनागाची सवारी येते असा दावा करत स्वतःला बाबा घोषित केलेले आहे.
गावात त्याने शेषनागाचे मंदिर देखील बांधलेले असून तिथे त्याचा दरबार भरतो आणि या दरबारात अनेक नागरिक समस्या घेऊन येतात त्यामध्येच ही महिला पुत्रप्राप्तीची समस्या घेऊन आलेली होती.आरोपी व्यक्ती याने पूजा करण्याच्या बहाण्याने 7 जून रोजी दुपारी एक वाजता या महिलेला पूर्णा नदीच्या काठावर नेलेले होते त्यावेळी महिलेसोबत तिचे पती देखील आलेले होते.
भोंदू बाबा संतोष याने पूजेतील काही साहित्य कमी पडलेले आहे असे सांगत महिलेच्या पतीला साहित्य आणायला पाठवून दिले आणि त्यानंतर या महिलेवर अत्याचार केला. महिलेचा पती परत आल्यानंतर महिलेने आपल्यासोबत घडलेला प्रकार पतिला सांगितला आणि त्यानंतर त्यांनी दर्यापूर ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ आरोपी बाबाला अटक केलेली असून याआधी देखील त्याने असे प्रकार केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आरोपी संतोष बावणे यांनी याआधी देखील आपल्या अंगात अनेकदा शेषनागाची सवारी येत आहे असा दावा केलेला आहे. 2017 मध्येच त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता तरी यावेळी चक्क बलात्काराच्या गुन्ह्यात हा बाबा अडकलेला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा बाबांचा सुळसुळाट झालेला असून भोंदू बाबांपासून नागरिकांनी सावधान राहण्याची गरज आहे मात्र अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या नागरिकांना कुठलेच भान राहत नाही त्यातून असे प्रकार घडतात .
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.