प्रयागराज (उत्तर प्रदेश) :- आतापर्यंत तुम्ही पती, पत्नी आणि वो असे अनेक किस्से ऐकले किंवा वाचले असतील. दोघांमध्ये तिसऱ्याची एन्ट्री झाली की, संसारा मोडतात.त्यानंतर भांडणं कोर्ट-कचेरी, घटस्फोटासारखे विषय घडतात. पण सध्या सोशल मीडियावर एका अनोख्या लग्नाची चर्चा सुरू आहे. एका पत्नीने आपल्या पतीचा विवाह आपल्याच लहान बहिणीसोबत लावून दिला आहे.
उत्तरप्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील शंकरगड परिसरात हा प्रकार घडला आहे. विशेष बाब म्हणजे या लग्नाला कुणाचाही विरोध नव्हता. लग्नाला नवरा मुलगा आणि मुलीकडील सर्व मंडळी उपस्थित होते. सगळ्यांना हैराण करायला लावणारा आणि विचित्र अशा विवाह सोहळ्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. आजतकने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
राजकुमार असं या विवाहित तरुणाचं नाव असून तो प्रयागराजमधील शंकरगड परिसरातील रहिवाशी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार हा मजुरी करत पोट भरतो. त्याचं लग्न रुमी नावाच्या एका तरुणीशी झालं होतं. रुमीचं आपल्या बहिणीवर खूप जीव होता.
बहिणीचं लग्नही थाटामाटात व्हावं अशी तिची इच्छा होती. मात्र, घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने बहिणीचे पुढे काय होणार? याची चिंता तिला लागली होती. बहिणीचं लग्न करण्यासाठी तिच्याकडे पैसे देखील नव्हते. म्हणून रुमीने आपल्या लहान बहिणीचं लग्न पतीसोबत लावण्याचा निर्णय घेतला.
रुमीने पतीला कसंबसं करुन आपल्या छोट्या बहिणीशी लग्न करायला तयार केलं. तिघेही मंदिरात पोहोचले. दोघांकडील मंडळी सुद्धा मंदिरात पोहचली. मग काय बायकोनेच आपल्या बहिणीचं लग्न नवरा राजकुमार याच्यासोबत लावून दिलं. लग्नानंतर दोन्ही बायकांना घेऊन राजकुमार घरी आला.
या लग्नाने राजकुमारची पहिली बायको जाम खूश आहे. शिवाय आता बहिणीच्या लग्नाची चिंता नसल्यानं रुमीचा सगळा ताणही हलका झाला आहे. पण गावातच नव्हे तर अख्ख्या देशात या लग्नाची तुफान चर्चा रंगली आहे. आता रुमी आणि तिचा नवरा राजकुमार आणि रुमीच्या नवऱ्याची बायको म्हणजेच तिची लहान बहिण हे तिघेही सुखी संसार करतील, एवढीच अपेक्षा अनेकांना लागून आहे.
हे पण वाचा
- गुणगौरव समारंभामुळे गुणवंत विद्यार्थी, पालक व शिक्षकांना प्रोत्साहन आमदार मा.अमोलदादा पाटील
- मारुती मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जात असलेल्या दोघांना डंपरची जोरदार धडक,दुचाकीस्वार तरुण ठार तर मित्र गंभीर जखमी.
- एरंडोल येथे वैफल्यग्रस्त ३८ वर्षीय युवकाची गळफास घेवून संपविले जीवन.
- मोयखेडा दिगरला घरकुल नाही तर कुळघर/ घरकुल योजनेचा फज्जा; गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून सुद्धा समितीचा चौकशीकडे कानाडोळा.
- प्रवीण गायकवाडांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ एरंडोल येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे निवेदन