जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. गायन कलेचे कौतुक होईल. छंद जोपासायला वेळ मिळेल.
वृषभ :-
नवीन गोष्टी समर्थपणे पेलाल. कौटुंबिक जबाबदारीची जाणीव ठेवावी. घर खर्च वाढू शकतो. वैचारिक चंचलता जाणवेल. कामात स्थैर्य ठेवावे.
मिथुन :-
आपली हौस भागवाल. गरज पडल्यास थोडे मागे यावे. मनातील निराशा झटकून टाकावी. जोडीदाराला शाब्दिक दिलासा द्यावा लागू शकतो. नियमांचे काटेकोर पालन करावे.
कर्क :-
स्वभावाला काहीशी मुरड घालावी लागेल. पोटाची काळजी घ्यावी लागेल. मनातील निराशाजनक विचार काढून टाकावेत. अति विचारात गढून जाऊ नका. झोपेची तक्रार कमी होईल.
सिंह :-
तरुण लोकांशी मैत्री कराल. जवळच्या लोकांच्या गाठी पडतील. तुमची कला चार चौघांसमोर सादर करता येईल. भागीदारीतून नफा मिळू शकेल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.
कन्या :-
केलेल्या कामातून समाधान मिळेल. चंचलतेला आवर घालावी लागेल. सहकारी वर्ग तुमच्यावर खुश असेल. नातेवाईकांची नाराजी दूर करावी. पत्नीशी मतभेदाची शक्यता.
तूळ :-
बौद्धिक प्रगल्भता वाढीस लागेल. कामात अपेक्षित यश मिळेल. समस्येकडे संधी म्हणून पहावे. जुनी गुंतवणूक फळाला येईल. शेअर्सच्या मार्गाने नफा कमवाल.
वृश्चिक :-
व्यावसायिक वातावरण पूरक राहील. घरातील कामासाठी वेगळा वेळ काढावा लागेल. सांपत्तिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल. अडचणीतून मार्ग काढण्याची तयारी ठेवावी. जोडीदाराकडून समजुतीची अपेक्षा राहील.
धनू :-
सारासार विचार करण्यावर भर द्याल. आशावादी दृष्टीकोन वाढीस लावावा. योग्य तर्क वापरावा लागेल. स्वत:चा मान राखून वागाल. खिलाडु वृत्तीने वागाल.
मकर :-
धाडसाला दूर दृष्टीची जोड द्यावी. कौटुंबिक वातावरणातून आनंद मिळेल. घेतलेली जबाबदारी हिंमतीने पार पाडाल. शांत चित्ताने विचार करावा. तुमची चिकाटी कौतुकास पात्र ठरेल.
कुंभ :-
व्यावहारिक ज्ञान वापरून कामे पूर्ण कराल. स्मरणशक्तीच्या जोरावर बारकावे लक्षात घ्याल. आपल्या ज्ञानाचा योग्य वेळी वापर कराल. टोचून बोलणे टाळण्याचा प्रयत्न करा. अति तिखट पदार्थ खाणे टाळा.
मीन :-
वरिष्ठांपुढे नवीन विचार मांडाल. हट्टीपणा कमी करावा लागेल. पित्त विकार बळावू शकतात. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नका. काही कामे तुमचा कस पाहतील.
हेही वाचलंत का ?
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.
- राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.गिरीष महाजन यांचा शिक्षक समन्वय संघ जळगाव,च्या वतीने आभार पर सत्कार.
- रस्त्याने जाणाऱ्या महिलेला भररस्त्यात गाठून माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव नाही तर ठार मारेन; धमकी देणाऱ्या आरोपीला 24 तासाच्या आत अटक.
- निवासी शाळेतून मुलीचा शाळेचा दाखला काढण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्थाचालक व त्यांच्या पत्नीने केलेल्या मारहाणीत मृत्यू.
- अल्पवयीन मुलीशी केली मैत्री,फूस लावून बसविले एक्स्प्रेसमध्ये अन् धावत्या रेल्वेत टॉयलेटमध्ये नेऊन नराधमाने केला लैंगिक अत्याचार.