दिंडोरीचे प्रातंधिकारी 40 लाखांच्या लाचेप्रकरणी ‘एसीबी’च्या जाळ्यात, महसूल विभागात मोठी खळबळ

Spread the love

नाशिक :- जिल्ह्यात ‘एसीबी’ने अनेक लाचखोरांवर धडाकेबाज कारवाया केल्या आहेत. आता नाशिकमधील आणखी एक बड्या अधिकाऱ्यावर ‘एसीबी’ने कारवाई केली आहे. नाशिकच्या दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी निलेश अपार यांनी तब्बल 40 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी त्यांच्यावर ‘एसीबी’ने कारवाई केली आहे.त्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

एका खासगी कंपनीची जमीन एनए (अकृषक) करण्यासाठी उपविभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी) निलेश अपार यांनी तब्बल 40 लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर या प्रकाराची ‘एसीबी’कडे तक्रार करण्यात आली होती.तक्रारदार यांची दिंडोरी येथे कंपनी आहे. या कंपनीचे बांधकाम करताना त्यांनी अकृषीक (एनए) परवानगी न घेतल्याने त्यांच्या कंपनीस प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली होती. पण सदर कंपनीवर कारवाई न करण्यासाठी आणि बंद कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे उपविभागीय अधिकारी निलेश अपार यांनी 50 लाखांची मागणी केली होती. मात्र, तडजोड करत 40 लाख रुपये स्विकारण्याची तयारी निलेश अपार यांनी दर्शवली होती. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश अपार यांची एसीबीकडून चौकशी करण्यात येत आहे. मात्र, थेट उपविभागीय अधिकाऱ्यानेच तब्बल 40 लाखांची लाच मागितल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. निलेश अपार यांनी लाचेची मागणी केल्यानंतर त्यांच्याविरोधात ‘एसीबी’कडे सदर व्यक्तीने तक्रार केली होती. त्यानंतर तक्रारीची शहानिशा करून कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून ‘एसीबी’ने धडाकेबाज कारवाई करत अनेकांवर गुन्हे दाखले केले आहेत. त्यानंतर आज थेट उपविभागीय अधिकाऱ्यांवर 40 लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार