मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : निफ्टीने अखेरचा मागील उच्चांक ओलांडण्यात यश मिळवले आणि (२८ जून) एक्स्पायरी दिवशी १९,००० चा मोठा अडथळा पार केला. सेन्सेक्सने २२ जून रोजी चाचणी केलेल्या ६३,६०१.७१ चा मागील उच्चांक ओलांडून नवीन विक्रमी उच्चांक नोंदवला.
बाजार विक्रमी स्तरावर उघडला आणि दिवसाची प्रगती होत असताना निफ्टी आणि सेन्सेक्सने इंट्राडे आधारावर अनुक्रमे १९,०११.२५ आणि ६४,०५०.४४ हा विक्रमी उच्चांक गाठला.
बाजार बंद होताना, सेन्सेक्स ४९९.३९ अंकांनी किंवा ०.७९ टक्क्यांनी वाढून ६३,९१५.४२ वर आणि निफ्टी १५४.७० अंकांनी किंवा ०.८२ टक्क्यांनी वाढून १८,९७२.१० वर होता.
अदानी समूहाचा प्रमुख अदानी एंटरप्रायझेस निफ्टीमध्ये सर्वाधिक ५.६% वाढला होता, जीक्यूजी भागीदार आणि इतर गुंतवणूकदारांनी समूहाच्या कंपन्यांमधील सुमारे $१ अब्ज अतिरिक्त भागभांडवल विकत घेतल्याच्या अहवालानुसार.
अदानी पोर्ट्स, जेएसडब्ल्यू स्टील, एनटीपीसी आणि टाटा मोटर्स हे इतर प्रमुख लाभधारक होते. आजच्या सत्रात एचडीएफसी लाईफ २% पेक्षा जास्त घसरला. फार्मा आणि मेटल प्रत्येकी एक टक्क्यांहून अधिक चढाईसह जवळजवळ सर्व क्षेत्रे हिरव्या रंगात रंगली. बँक, फायनान्स, एफएमसीजी आणि एनर्जीनेही चांगला नफा मिळवला.
बकरी ईदनिमित्त २९ जून रोजी बाजार बंद राहणार आहे.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४
- जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेना महायुतीचे गुलाबराव पाटील यांच्या दणदणीत विजय.
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन