नाशिक :- वसेना उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख शुभांगी ताई पाटील यांनी नुकताच नाशिक जिल्ह्यात शिवसेनेचे महिला संघटन वाढावे यासाठी नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यात संपर्क दौरा केला. नाशिक जिल्ह्यातील चांदवड, मनमाड, मालेगाव, निफाड, येवला, इत्यादी तालुक्यांमध्ये शुभांगी ताई पाटील यांनी दौरा करत महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत विविध ठिकाणी मीटिंग आयोजित केल्या.
या दौऱ्यात शुभांगी ताई पाटील यांच्यासोबत मुंबईहून आलेल्या शिवसेनेच्या नाशिक जिल्हा महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख रंजनाताई नेवाळकर तसेच गायत्री ताई व नाशिक जिल्ह्यातील महिला पदाधिकारी यादेखील दौऱ्यात सामील होत्या. या महिला नेत्यांनी नाशिक जिल्ह्यात जुन्या जाणत्या महिला नेत्या व नवोदित पदाधिकारी व कार्यकर्ते यांची सांगड घालत जिल्ह्यात महिला आघाडीचे कार्य वाढीसाठी मार्गदर्शन केले तसेच महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण व्हावे यासाठी त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय सुरू करून रोजगार निर्मिती करावी, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या योजना आणून पक्षातील महिलांना सक्षम करावे याबाबत मार्गदर्शन केले. एखादा पुरुष नेता केवळ घरातील प्रमुख व्यक्तीला भेटून आपले कार्य करू शकतो , परंतु महिला पदाधिकारी या लोकांच्या चुलीपर्यंत जाऊन माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य व ध्येय धोरण लोकांपर्यंत पोहोचवू शकतात. म्हणून महिला आघाडी देखील तितकीच महत्त्वाची आहे असे सांगत महिलांना पुढील कार्यासाठी मार्गदर्शन केले.
या दौऱ्यात चांदवड तालुक्याच्या तालुकाप्रमुख रोशनी ताई निफाड तालुक्याच्या तालुका प्रमुख सौ पवार ताई श्री वेदमुथा सर तसेच जिल्हा प्रमुख उपजिल्हाप्रमुख व वेगवेगळ्या तालुक्याच्या तालुका अध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष व पदाधिकारी, युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख ,पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम