पारोळा तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस तीन वर्ष शिक्षा.

Spread the love

पारोळा :- येथील पोलिस स्टेशन येथे दी 6/4/2019 रोजी पीडित अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी नामे शाकीर मुनीर खाटीक रा मोहाडी ता पारोळा याचेवर गुन्हा कलम 354,323 भा द वि सहकलम-11, 12 पोकसो कायदा अन्वये अटक केली असून नमूद गुन्ह्याचा तपास महिला फौजदार यशोदा कणसे यांनी तपास करून आरोपपत्र सेशन कोर्ट अमळनेर येथे दाखल केले होते नमूद गुन्ह्यात एकूण 13 साक्षदार तपासण्यात आले

असून मा.एस बी गायधने साहेब जिल्हा व सत्र न्यायालय प्रथमवर्ग अमळनेर यांनी नमूद आरोपीस कलम 354 IPC मध्ये 3 वर्ष शिक्षा व 500/- रुपये दंड,दंड न भरल्यास 3 महिने शिक्षा तसेच कलम 323 IPC मध्ये 1 वर्ष कारावास व 500/- रुपये दंड,दंड न भरल्यास 2 महिने शिक्षा तसेच कलम 12 पोक्सो मध्ये 3 वर्ष कारावास W 500/- रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने कैद अशी शिक्षा एका वेळी भोगणे बाबतची शिक्षा झाली असून सरकारी वकील श्री शशिकांत पाटील यांनी कामकाज पाहिले असून पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी ASI उदयसिंग साळुंके यांनी कामकाज पाहिले आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार