निंभोरा प्रतिनिधी परमानंद शेलोडे:
रावेर :- तालुक्यातील मोठे वाघोदा रावेर येथील रहिवासी पत्रकार तथा कवी व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले कमलाकर माळी यांना दि 23 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे सुलक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे कवी मंगलदास मोरे लिखीत बहरलेला निसर्ग पुस्तक प्रकाशन सोहळा व आकांक्षा पंडीत हिच्या वाढदिवसाचा निमीत्त आयोजित कार्यक्रमात अबुल कलाम आझाद संशोधन केद्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सेवा गौरव पुरस्कार सन्मानचिन्ह शाल श्रीफळ भेट देऊन गौरवण्यात आले हा पुरस्कार सहाय्यक पोलिस निरिक्षक दामिनी पथक छ.संभाजीनगर ग्रामीण.आरती जाधव व
वर्षा व्हगाडे स.पो.नि.यांच्या हस्ते देण्यात आला.त्यांनी आतापर्यंत गावात मोफत नेत्र शिबीर रक्तदान शिबिर गाव फलक ग्रामस्थांसाठी स्वखर्चाने मोफत वाचनालयची सोय कोवीड मध्ये मोफत मास्क वाटप तसेच व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातुन उपक्रम राबवत असतात अशा विविध सामाजिक कार्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी संस्थेचे अध्यक्ष सुमीत पंडीत यांनी निवड केली त्यावेळी आला बाबूराव फेम सुरेशजी कांबळे,प्रा.विष्णू सुरासे (हास्य कवी), कवियत्री उज्वला बागुल,डॉ तेजस्वी तुपसागर,संस्थेचे अध्यक्ष सुमीत पंडीत.पुजा पंडीत भरत आर कल्याणकर सुमित संजय.प्रा. बालाजी कांबळे, ज्युनिअर चार्ली सोमनाथ स्वभावणे.कल्पेश पंडीत.चेतन पाटील उपस्थित होते.सर्व परीसरातुन कमलाकर माळी यांचे कौतुक होत आहे.
हे वाचलंत का ?
- लग्न होत नाही म्हणून एजेंटला दिले 5 लाख रुपये, सोन दिल लग्न लागलं अन् दुसऱ्याच दिवशी नवरी फरार, 5 जणांन विरोधात गुन्हा दाखल.
- उसनवार दिलेले अडीच लाख रुपये दे, किंवा माझ्याशी लग्न कर असा तगादा लावणाऱ्या महिलेच्या मित्रांने केली हत्या.
- जळगाव एमआयडीसी पोलिसांनी अट्टल दुचाकी चोरास केले जेरबंद; साडे सात लाखांच्या 15 मोटरसायकली जप्त
- आमदार अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रा.वसंत हंकारे यांच्या एरंडोल येथील व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद
- पारोळा बायपास महामार्गावर गॅसचा टँकर कलंडला:.…..प्रशासनाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला…..