अहमदनगर : नाती आणि माणुकीलाही काळीमा फासणारी घटना अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील मजलेशहर या गावात घडली आहे. सहा महिन्यांपासून सुनेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या सासऱ्याने अखेर गरोदर सुनेचा गळा आवळला, तर दोन वर्षांच्या नातीला पाण्यात बुडवून खून केला.
कारभारी ज्ञानदेव लोढे (वय ६२ वर्ष, रा. मजलेशहर) असं नराधम सासऱ्याचं नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. महिलेचा भाऊ तिला यात्रेसाठी घेऊन जाण्यासाठी आलेला असतानाच ही घटना उघडकीस आली आहे.ऋतुजा संतोष लोढे (वय २२ वर्ष) व समृद्धी संतोष लोढे (वय २ वर्ष) यांचा खून झाला आहे. ऋतुजा ही पाच महिन्यांची गरोदर होती. ऋतुजाचे चुलते जनार्धन नारायण मगर (रा. मजलेशहर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कारभारी ज्ञानदेव लोढे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे
यासंबंधी माहिती अशी की, ऋतुजाचा सासरा तिच्यावर चारित्र्याचा संशय घेत होता. तिच्याकडे गेल्या काही महिन्यांपासून शरीर सुखाची मागणी करीत होता. ती त्याला नकार देत होती. या रागातून त्याने गुरूवारी सायंकाळी तिचा गळा आवळून खून केला, तर नात समृद्धी हिला पाण्याच्या टबात बुडवून मारले.
ही घटना घडली तेव्हा ऋतुजाचा भाऊ ऋषिकेश तिला भावीनिमगाव येथे यात्रेसाठी घेऊन जाण्यास आला होता. तो तिच्या घरी पोहचला तेव्हा ऋतुजा बाहेर ओट्यावर पडलेली होती. तर सासरा कारभारी याने समृद्धीला पाण्याने भरलेल्या बकेटमध्ये बुडवून दाबून ठेवले होते. ऋषिकेश याने पळत जाऊन समृद्धीस सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने तिला ओट्यावर फेकुन दिले. ऋषिकेश याने आरडाओरड केल्याने घरातील इतर लोक बाहेर आहे.
त्यानंतर दोघींना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तोपर्यंत दोघींचाही मृत्यू झाला होता.ऋतुजाचे चुलते जनार्धन नारायण मगर यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी कारभारी ज्ञानदेव लोढे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






