आषाढी एकादशीनिमित्त भालगाव येथे हजारो भाविकांना फराळ वाटप.

Spread the love

एरंडोल- तालुक्यातील भालगाव येथील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांना सुमारे दोन क्विंटल
साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुख्मिणी संस्थांनतर्फे दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

आषाढी एकादशीनिमित्त भालगाव येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिरात दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.भालगाव परिसरातील अनेक गावातील
भाविकांनी वारकरी वेशात पायीवारी काढून मंदिरात दर्शन घेतले.तसेच दरवर्षी भालगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त भरणा-या यात्रेत विविध व्यावसायिकांनी दुकाने लावले होते.महिलांनी विविध वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानांवर गर्दी केली होती. सामाजिक कार्यकर्ते मनोज मराठे यांचेतर्फे सुमारे पाच
हजार भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले.

मनोज मराठे सुमारे बारा वर्षांपासून भाविकांना स्वखर्चाने फराळाचे वाटप करीत आहेत. संस्थानच्यावतीने दिवसभर भजन,भारुडे आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सायंकाळी गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली.रात्री ह.भ.प.सी.एच.पाटील यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.

आमदार चिमणराव पाटील,माजीमंत्री डॉ.सतीश पाटील,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.हर्शल माने,जिल्हा परिषदेचे माजी सभापती डॉ.दिनकर पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, तालुकाप्रमुख रवींद्र जाधव यांचेसह विविध राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांनी दर्शन घेतले.कार्यक्रमासाठी मंदिराचे विश्वस्त देविदास मराठे,श्रीराम मराठे,माजी सरपंच कैलास पारधी,छोटू मराठे,सुभाष पाटील,नामदेव पाटील,कैलास पाटील यांचेसह ग्रामस्थांनी सहकार्य केले.

हे पण वाचा

टीम झुंजार