झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
वालचंदनगर :- ( ता. इंदापूर ) दि. २४/६/२०२३ रोजी श्रीवर्धमान विद्यालयामध्ये बालगोपाळांसाठी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करून दिंडीमध्ये सहभागी झाले होते. विठू नामाच्या गजरात व ज्ञानोबा माऊली तुकाराम या नामस्मरणात सर्व विद्यार्थी भक्तिभावाने रंगून गेले.
या प्रतिकात्मक पालखीचा पहिला विसावा बाजारपेठ येथे झाले. येथेच गोल रिंगण पार पडले. विद्यार्थ्यांनी फुगडी बेडूक उड्या मारून पालखीस प्रदक्षिणा घातली. पालखी सोहळ्यातील गोल रिंगण पाहण्यासाठी वालचंदनगर मधील नागरिक उपस्थित होते. अनेक पालक व नागरिकांनी या पालखी सोहळ्याचे कौतुक केले.
नंतर पालखी शाळेमध्ये परत आली त्यावेळेस शाळेच्या आवारात कलाशिक्षक अतुल गायकवाड व प्रमोद गायकवाड तेथे बसले असताना माऊलीची वेशभूषा साकारलेले बाल विद्यार्थी पांडुरंग जवळ आले व म्हणाले… आज वारी निमित्त आम्हाला जेवण आहे का सर ?
त्यावेळेस दोन्ही कला शिक्षकांनी एकमेकांकडे पाहिले व एका क्षणांत जे काही ठरले व त्यांनी विद्यार्थी बाल माऊलींना सांगितले हो आहे जेवण !
त्यानंतर दि.२६/६/२०२३ रोजी दोन्ही कला शिक्षकांनी एकत्र येऊन वर्धमान विद्यालयामध्ये वारी निमित्त विद्यालयातील सर्व विद्यार्थी बालमाऊलींना महाप्रसादाचे आयोजन केले होते. त्यादिवशी शाळेमध्ये पंढरीची वारी भरली होती. विद्यार्थी बालमाऊली आनंदाने महाप्रसादाचा आस्वाद घेत होती. सर्व अधिकारी, वर्धमाननीय परिवार शिक्षक शिक्षिका वृंद माऊलींना प्रसाद वाढण्यासाठी मग्न झाल्याचे दिसत होते. सर्वांची लगबग चालू होती. सुमधुर आवाजामध्ये अभंग सुरू होते. विद्यालयातील संपूर्ण परिसर पंढरीमय झाल्याचे दिसत होते.
त्याचबरोबर आषाढी वारी निमित्त कलाशिक्षक अतुल गायकवाड यांनी कलाप्रेमी विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन रंग भरणी, फलक लेखन कसे करावे या व अशा अनेक गोष्टींचे मार्गदर्शन करत. वारी पंढरीची, विठू माऊलीची, उत्कृष्ट विलोभनीय, मनमोहक असे फलक लेखन केले.
यावेळी शाळा समिती अध्यक्ष मकरंद वाघ व उपाध्यक्ष प्रशांत महामुनी, मुख्याध्यापक हनुमंत कुंभार , उप मुख्याध्यापक अरुण निकम , पर्यवेक्षक काशिनाथ हिरवे सर व पर्यवेक्षिका सौ.,अश्विंदर घुले मॅडम, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या दोन्ही कला शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले .
हे पण वाचा
- लग्न होत नाही म्हणून एजेंटला दिले 5 लाख रुपये, सोन दिल लग्न लागलं अन् दुसऱ्याच दिवशी नवरी फरार, 5 जणांन विरोधात गुन्हा दाखल.
- उसनवार दिलेले अडीच लाख रुपये दे, किंवा माझ्याशी लग्न कर असा तगादा लावणाऱ्या महिलेच्या मित्रांने केली हत्या.
- जळगाव एमआयडीसी पोलिसांनी अट्टल दुचाकी चोरास केले जेरबंद; साडे सात लाखांच्या 15 मोटरसायकली जप्त
- आमदार अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रा.वसंत हंकारे यांच्या एरंडोल येथील व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद
- पारोळा बायपास महामार्गावर गॅसचा टँकर कलंडला:.…..प्रशासनाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला…..