एरंडोल :-मेहुणबारे येथून जळगाव येथे जात असतांना कासोदा रस्त्यावर वाहनावर झाड कोसळून मृत्युमुखी पडलेले आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक सुदर्शन दातीर आणि चालक अजय चौधरी यांच्या पार्थिवावर एरंडोल पोलीस स्टेशनच्यावतीने पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी उपस्थित पोलीस कर्मचारी भावनाविवश झाले होते.सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर यांचेवर नासिक येथे तर चालक अजय चौधरी मुक्ताईनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
जळगाव येथील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर व त्यांचे सहकारी चालक अजय चौधरी,चंद्रकांत शिंदे,निलेश सूर्यवंशी,भरत जेठवे हे मेहुणबारे येथे तपासकामासाठी गेले होते.तपासाचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व कर्मचारी वाहन क्रमांक एम.एच.१९ एम.०७५१ ने जळगाव येथे जात असताना कासोदा रस्त्यावरील अंजनी नदीच्या उजव्या कालव्याजवळ चीचंचे जीर्ण झालेले झाड पोलीस वाहनावर कोसळल्यामुळे सहाय्यक निरीक्षक सुदर्शन दातीर आणि चालक अजय चौधरी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
सहाय्यक निरीक्षक दातीर आणि चालक चौधरी यांच्या मृतदेहाची ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी डॉ.मुकेश चौधरी व डॉ.राहुल पुराणिक यांनी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.एरंडोल पोलीस स्थानकाच्या आवारात सहाय्यक निरीक्षक दातीर आणि चालक अजय चौधरी यांच्या मृतदेहावर पुष्पहार अर्पण करून पोलीस प्रशासनातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी अमळनेर विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील नंदनवाळ,पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे,उपनिरीक्षक शरद बागल,
https://www.youtube.com/@zunjaarnews
Like share and Subscribe our youtube Channel
वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा, सबस्क्राईब करा व आमच्या यूट्यूब चॅनल ज्वाईंट करा. धन्यवाद..,
कासोदा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक निरीक्षक योगिता नारखेडे, हवालदार अनिल पाटील,प्रशांत पाटील, काशिनाथ पाटील, अकिल मुजावर,सुनील लोहार,मिलिंद कुमावत, रवींद्र तायडे,मनोज पाटील,संतोष चौधरी,संदीप पाटील, विलास पाटील,माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांचेसह पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाचे जवान उपस्थित होते. श्रद्धांजली अर्पण करीत असतांना पोलीस अधिकारी व कर्मचारी भावनाविवश झाले होते.आमदार चिमणराव पाटील व पदाधिका-यांनी पोलीस स्थानकास भेट देवून पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांचेकडून अपघाताची माहिती जाणून घेतली.
हे पण वाचा
- Viral Video: एक तरुण स्टंटबाजी करण्यासाठी धावत्या लोकल ट्रेनच्या छतावर चढला अन् अचानक पुढं भयंकर घडलं; पहा व्हिडिओ
- रस्त्यावरील विजेचा खांब बाजुला करा,या मागणीसाठी एका नागरिकाने चक्क विजेचा खांबावरच खाट बांधून केले उपोषण
- अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्यांच्या खून करणाऱ्या आई व तिच्या प्रियकरास जन्मठेप.
- “माझा मृत्यू माझ्या पत्नीच्या छळामुळे झाला” असे माझ्या शवपेटीवर लिहा ही माझी शेवटची इच्छा आहे अशी सुसाईट नोट लिहून तरुणाने केली आत्महत्या.
- एक तरुण नोकरी गेल्याने निराश होऊन कंटाळून आपल्या देशात येण्यासाठी निघाला अचानक त्याच्या नशिबाची बंद कवाडे उघडली अन् तो झाला 13 कोटींचा मालक