CCTV VIDEO : रेल्वे ट्रॅकच्या कडेला जेवणाचा डबा धुण्यासाठी गेला, अचानक फास्ट लोकल आली अन् दुर्दैवी घटना घडली.पहा व्हिडिओ

Spread the love

CCTV VIDEO मुंबई : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासन नेहमीच प्रयत्नशील असल्याचे आपल्याला यला मिळते. विविध उद्घोषणा करून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जागृतही केली जाते. परंतु प्रवासी या सूचनांकडे दुर्लक्ष करून आपला जीव धोक्यात रेल्वे पटली ओलांडणे किंवा दरवाजावर उभे राहून प्रवास करताना दिसतात.तर काही वेळेला रेल्वेमध्ये चढताना हात निसटणं, पाय घसरणं किंवा अनेक वेळा प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे अपघात होताना दिसतात.

अशीच एक दुर्दैवी घटना मालाड रेल्वे स्टेशनवर घडली आहे. स्टेशनवरील धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की, मुंबईच्या मालाड रेल्वे सटेशनवरील प्लॅटफॉर्म तीनवर दोन तरुण प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरील कट्ट्यावर बसून डबा खातात.

एकत्र जेवण केल्यानंतर ते दोघंही जेवणाचा डबा आणि हात धुण्यासाठी रेल्वे ट्रॅकच्या कडेला जातात. तिथे उभे असताना अचानक चर्चगेटच्या दिशेहून बोरिवलीकडे जाणारी एसी जलद लोकल येते. यावेळी एक तरुण लोकल पाहून बाजूला होतो, मात्र दुसऱ्या तरुणाला काही कळायच्या आतच त्याला लोकलची जोरदार धडक बसते आणि प्लॅटफॉर्मवर दूरपर्यंत फेकला जातो.

त्याच्या कानातून रक्तस्त्राव सुरू होतो. त्यामुळे त्याला उपचारासाठी कांदिवली शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. ही दुर्दैवी घटना 17 जून रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली.

हे पण वाचा


टीम झुंजार