सोयगाव दि.०१ रोजी कै.वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त पंचायत समिती सोयगाव व कृषि विभाग सोयगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषि दिन साजरा करून कृषि संजीवनी सप्ताहाची सांगता करण्यात आली.
आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष भालेराव कृषि अधिकारी पंचायत समिती सोयगाव यांनी केले, तालुका कृषि अधिकारी मदन सिसोदिया यांनी कै. वसंतरावजी नाईक यांच्या जीवनक्रमाची व त्यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यची माहिती दिली,
व्ही.टी.जाधव नायब तहसीलदार सोयगाव यांनी ई पिक पहाणी, अतिवृष्टी झाल्यास घ्यावयाची काळजी या बद्दल मार्गदर्शन केले, मनोज सैंदाणे कृषी अधिकारी सोयगाव यांनी महाडीबीटी योजना, एम.आर.ई.जी.एस.योजना याविषयी माहिती दिली, संपत वाघ मंडळ कृषि अधिकारी बनोटी यांनी पी एम किसान योजनेची माहिती दिली, रमेश गुंडीले मंडळ कृषि अधिकारी फर्दापूर यांनी पिक विमा योजनेची माहिती दिली, अमोल महाजन बी.टी.एम यांनी आत्मा योजना, शेतकरी गट संघटन व प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजनेची माहिती दिली,
प्रगतीशील शेतकरी ईश्वर शिवाजी सपकाळ तिडका, दिलीप यादव पाटील, सुनिल तुकाराम पाटील यांनी त्यांचे शेतीतील वैयक्तीक अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समाधान चौधरी कृषी पर्यवेक्षक फर्दापूर -१ यांनी केले व आभार प्रदर्शन प्रदीप पाटील कृषी पर्यवेक्षक बनोटी -१ यांनी केले.
आजच्या कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत अधिकारी व कर्मचारी, पंचक्रोशीतील प्रगतीशील शेतकरी यांची उपस्थिती होती.