मोठी बातमी : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ९ मंत्रिपद! ‘या’ नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Spread the love

राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला आहे.

मुंबई– राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ३० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ तर छगन भुजबळ यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या राजकीय भूकंपाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील, धर्मरावबाबा आत्राम यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ९ मंत्रिपदे दिली आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. आता अजित पवार राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री असणार आहेत.

नुसती सेना नाही तर राष्ट्रवादी पण फोडून दाखवली”

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला असून अजित पवार आज मंत्री पदाची शपथ घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार अचानक राजभवनात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अन्य काही नेते देखील उपस्थित आहेत. माहितीनुसार, अजित पवार महाराष्ट्राच्या सत्तेत सामील होणार असून, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अशातच मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

“विश्व प्रवक्ते संजय राऊत यांनी करून दाखवले. नुसती सेना नाही तर राष्ट्रवादी पण फोडून दाखवली”, अशा शब्दांत काळे यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार