धरणगाव : – घरासमोर खेळून झाल्यानंतर चिमुकला घरात आला अन् चक्कर येऊन पडला. मात्र यातच चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे हा काळजाला घरं पाडणारा प्रकार घडला.
कार्तिक शशिकांत बडगुजर (वय २ वर्ष) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. अवघ्या दोन वर्षाच्या चिमुकल्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या घटनेने मोळी खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे शशिकांत बाबूलाल बडगुजर हे वास्तव्यास आहेत. पत्नी व दोन मुले असा त्यांचा परिवार आहे. त्यांचा दोन वर्षाचा मुलगा कार्तिक बडगुजर बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे अंगणात खेळत होता. सकाळी ९ वाजेच्या सुमारास अंगणात खेळून झाल्यानंतर कार्तिक घरात आला व अचानक जमिनीवर पडला.
हे पाहून कार्तिकचे आजोबा बाबूलाल बडगुजर यांनी त्याला उचलले. परंतु तो कोणतीही हालचाल करत नव्हता. त्यामुळे भांबवलेल्या आजोबा तसेच कुटुंबियांनी लागलीच डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी तपासले असता, कार्तिक याची प्राणज्योत मालवल्याचे समोर आले. हृदयविकाराने त्याचे निधन झाल्याचे त्यांनी सांगितले.
अचानकच्या घटनेने कुटुंबियांना बसला मोठा धक्का
अतिशय गोंडस व हुशार बालकाचा अचानक मृत्यू झाल्याने पालकांना मोठा मानसिक धक्का बसला. कार्तिकच्या मृत्यूने कुटुंबियांनी काळीज चिरणारा आक्रोश केला. कुटुंबियांचा आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते.
मयत कार्तिक हा एका दैनिकाचे पेपर एजन्सी धारक बाबूलाल काशिनाथ बडगुजर यांचा नातू होता. बुधवारी दुपारी २ वाजता मृत कार्तिकवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अवघ्या दोन वर्षाच्या चिमुकल्याचा कोवळ्या वयात हृदयविकाराने मृत्यू झाल्याच्या या घटनेमुळे पिंप्री परिसरासह जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
आता कुठल्याही वयात कुणालाही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, हे या घटनेमुळे अधोरेखीत झाले आहे, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.
हे वाचलंत का ?
- Viral Video: एक तरुण स्टंटबाजी करण्यासाठी धावत्या लोकल ट्रेनच्या छतावर चढला अन् अचानक पुढं भयंकर घडलं; पहा व्हिडिओ
- रस्त्यावरील विजेचा खांब बाजुला करा,या मागणीसाठी एका नागरिकाने चक्क विजेचा खांबावरच खाट बांधून केले उपोषण
- अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्यांच्या खून करणाऱ्या आई व तिच्या प्रियकरास जन्मठेप.
- “माझा मृत्यू माझ्या पत्नीच्या छळामुळे झाला” असे माझ्या शवपेटीवर लिहा ही माझी शेवटची इच्छा आहे अशी सुसाईट नोट लिहून तरुणाने केली आत्महत्या.
- एक तरुण नोकरी गेल्याने निराश होऊन कंटाळून आपल्या देशात येण्यासाठी निघाला अचानक त्याच्या नशिबाची बंद कवाडे उघडली अन् तो झाला 13 कोटींचा मालक