अंगावर ब्लँकेट पांघरून गैरवर्तन करत असल्याच्या व्हिडिओ एका प्रवाशाने केला मोबाईल मध्ये शूट.
हाथरस (उत्तर प्रदेश) :- डेपोच्या बसमध्ये एका कंडक्टरने (वाहक) प्रवासी तरुणीबरोबर लैंगिक संबंध ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी कंडक्टर आणि प्रवासी तरुणी धावत्या बसमध्ये मागील सीटवर लैंगिक संबंध ठेवत होते.बसमधील एका प्रवाशाने ही संपूर्ण घटना आपल्या मोबाइलमध्ये शूट केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. याप्रकरणी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने संबंधित कंडक्टरचा आणि चालकाचा करार रद्द केला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार, हाथरस डेपोची बस लखनऊच्या दिशेनं जात होती. यावेळी धावत्या बसमध्ये कंडक्टर प्रवासी तरुणीबरोबर लैंगिक संबंध ठेवत होता. एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडीओ शूट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये, कंडक्टर बसच्या मागील सीटवर प्रवासी तरुणीबरोबर लैंगिक संबंध ठेवताना दिसत आहे. दोघंही अंगावर ब्लँकेट पांघरून हे गैरवर्तन करत आहेत.
हे गैरवर्तन अनेक प्रवाशांच्या लक्षात आलं. या कृत्यामुळे संतप्त झालेल्या एका प्रवाशाने जाब विचारायला सुरुवात केली. यावेळी अर्धनग्न अवस्थेत असणाऱ्या कंडक्टरने व्हिडीओ शूट करणाऱ्या प्रवाशाबरोबर हुज्जत घातली. ही घटना दहा दिवसांपूर्वी घडली असल्याचं बोललं जात आहे.
ड्रायव्हर आणि कंडक्टरचा करार रद्द
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या सहाय्यक प्रादेशिक व्यवस्थापकाने (एआरएम) त्वरीत कारवाई केली आहे. या घटनेत सहभागी असलेल्या ड्रायव्हर आणि कंडक्टरचा करार रद्द केला आहे. हाथरस डेपोच्या एआरएम शशीराणी यांनी या व्हिडीओची पुष्टी केली आहे. ही घटना अंदाजे दहा दिवस आधी घडल्याचंही त्यांनी सांगितलं. एका प्रवाशाच्या तक्रारीनंतर परिवहन अधिकाऱ्यांनी ड्रायव्हर आणि कंडक्टरचे करार तातडीने रद्द केले. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
हे पण वाचा
- Viral Video: एक तरुण स्टंटबाजी करण्यासाठी धावत्या लोकल ट्रेनच्या छतावर चढला अन् अचानक पुढं भयंकर घडलं; पहा व्हिडिओ
- रस्त्यावरील विजेचा खांब बाजुला करा,या मागणीसाठी एका नागरिकाने चक्क विजेचा खांबावरच खाट बांधून केले उपोषण
- अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्यांच्या खून करणाऱ्या आई व तिच्या प्रियकरास जन्मठेप.
- “माझा मृत्यू माझ्या पत्नीच्या छळामुळे झाला” असे माझ्या शवपेटीवर लिहा ही माझी शेवटची इच्छा आहे अशी सुसाईट नोट लिहून तरुणाने केली आत्महत्या.
- एक तरुण नोकरी गेल्याने निराश होऊन कंटाळून आपल्या देशात येण्यासाठी निघाला अचानक त्याच्या नशिबाची बंद कवाडे उघडली अन् तो झाला 13 कोटींचा मालक