Viral Video: : घरामध्ये आपण अनेक पाळीव प्राणी पाळतो. मात्र यापैकी कुत्रा हा सर्वात प्रामाणिक आणि निष्ठावाण मानला जातो. तो मालकाच्या सर्व गोष्टी ऐकतोही आणि वेळेला मालकासाठी त्याच्या संरक्षासाठी काहीही करायला तयार असतो.सोशल मीडियावर कु्त्र्याचे विविध व्हिडीओ समोर येत असतात. नुकताच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये रस्त्यावरील कुत्र्याने एका तरुणीचा जीव वाचवला. तिला किडनॅप होण्यापासून वाचवलं. हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून लोक कुत्र्यावर कौतुकांचा वर्षाव करत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी रस्त्याने चालतk असल्याचे दिसत आहे. तेवढ्यात एक कार तिच्या मागून येते आणि मुलीसमोर थांबते. कारमधून एक व्यक्ती बाहेर येतो जो मुलीला पळवून नेण्याच्या प्रयत्नात दिसतोय. हे पाहून ती मुलगी घाबरते आणि मागे पाऊल टाकू लागते.
हे पाहून ती व्यक्तीही कार मागे आणतो. व्यक्ती गाडीतून बाहेर उतरणार तेवढ्यात एक कुत्रा पळत येतो आणि व्यक्तीवर भिंकू लागतो. कुत्रा व्यक्तीला कारच्या बाहेरच येऊन देत नाही. मग नाईलाजाने कार वाल्याला तेथून जावं लागतं.तो कार घेऊन निघून जातो. कुत्राही काही अंतरापर्यंत गाडीचा पाठलाग करतो. हे पाहून मात्र मुलगी पुरतीच घाबरली. तिला काहीच सुचत नाही ती काही वेळ इकडे तिकडे बघते मग तेथून रडत पळत जाते.
@Human101Nature नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 32 सेकंदांच्या व्हिडीओवर अनेक कमेंट येताना दिसत आहेत. लोक कुत्र्याचं कौतुक करत तो बुद्धिमान असल्याचं बोलत आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






