पोट नीट साफ होत नाही; दिवसभर गॅसेसचा त्रास? १ आयुर्वेदीक उपाय, पचनाचे त्रास राहतील लांब

Spread the love

Gas and Bloating Solution : आयुर्वेदीक डॉक्टर दीक्षा भावसार यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून यासंदर्भातील एक उपाय शेअर केला आहे.

सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये गॅस होणं, ब्लोटींग, पोट साफ नसणं या समस्या अगदी कॉमन झाल्या आहेत. जास्तवेळ बसल्यानं शरीर वेगवेगळ्या आजारांचे शिकार बनते. गॅस आणि ब्लोटींगच्या त्रासावर रोज औषधं घेणं तब्येतीसाठी चांगलं नसते. या गोळ्यांमुळे तात्पुरता फरक जाणवत असला तरी कालांतराने त्याचे दुष्परीणाम जाणवू शकतात.

Pic for Google

काही घरगुती उपाय करून तुम्ही पोटाच्या विकारांना लांब ठेवू शकता. आयुर्वेदीक डॉक्टर दीक्षा भावसार यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून यासंदर्भातील एक उपाय शेअर केला आहे. त्यांच्यमते किचनमधील एक इंग्रेडिएंट गॅसच्या समस्येवर त्वरीत आराम मिळवून देऊ शकतो.

डॉक्टर दीक्षा यांच्यामते हिंगाचा वापर करून तुम्ही ब्लोटींगची समस्या टाळू शकता. यामुळे गॅस बाहेर निघण्यास मदत होते. याची चव चांगली नसली तरी आरोग्याच्या दृष्टीनं अनेक फायदे आहेत. डाळीत, झुणक्यात, भाजीत हिंग वापरल्यानं अन्न लवकर पचण्यास मदत होते. हे शरीरातील अग्नि तत्व वाढवतात. ज्यामुळे आपल्या पोटातील डायजेस्टिव्ह ज्यूस जास्त तयार होतो. जर कोणालाही कफ, वातदोष असेल तर हिंगाचा समावेश आहारात करायला हवा.

Pic for Google

डॉक्टर दीक्षा सांगतात की साधारण जेवणात हिंगाचा वापर केल्यानं ब्लोटींग, पोट जड वाटणं, पोटदुखी या समस्यासुद्धा दूर होतात. हिंग तुम्ही ताकासह मिसळून पिऊ शकता. डाळ किंवा कमी तेलाच्या भाज्यांमध्ये हिंगाचा वापर करू शकता याशिवाय तूपात हिंग मिसळूनही घेतले जाते. हिंग १ चमचा देशी तुपासह घेतल्यास आराम मिळतो.

एका दिवसात किती हिंग खायला हवं?

डॉक्टर दीक्षा यांनी आपल्या पोस्टमध्ये हिंगाच्या प्रमाणाबाबतही माहिती दिली आहे. त्यांच्यामते एक दिवसात एका वयस्कर व्यक्तीनं ५०० मिलीग्राम म्हणजेच अर्ध्या ग्रामपेक्षा जास्त हिंगाचे सेवन करू नये. कोणत्याही स्वरूपात हिंगाचे सेवन केले तरी ते जास्त असू नये. जास्त हिंग खाल्ल्यानं पोट खराब होण्यासह एक्ने, पिरिएड्समध्ये वेदना होणं, केस गळणं, ब्लड प्रेशरच्या समस्या उद्भवू शकतात.

दिवसातून कोणत्यावेळी हिंग खायचं ?

हिंग खाण्याची योग्यवेळ जेवणादरम्यानच असते. जेव्हा तुम्ही जेवण असाल तेव्हाच हिंगाचाही समावेश करा. पहिल्या घासात तुम्ही तुपासह हिंगाचे सेवन करू शकता. याशिवाय शेवटच्या घासातही खाता येईल. जर तुम्ही डाळीत किंवा भाजीत हिंग मिसळत असाल तर परत वेगळं हिंगाचे सेवन करू नका.

Pic for Google

डॉ. दीक्षा यांच्या मते, हिंग शरीरातील ब्लॉकेजेस कमी करते. यामुळे वात दोष म्हणजेच गॅसची समस्या बर्‍याच प्रमाणात कमी होते, हे पचनासाठी उत्तम आहे. हृदयाच्या समस्येसाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. वास्तविक, हिंगामुळे रक्त पातळ होते जे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी चांगले असू शकते. हिंगाचे सेवन डोळ्यांसाठीही फायदेशीर ठरू शकते.

https://www.instagram.com/reel/Ctji-Y8ImJM/?igshid=YmM0MjE2YWMzOA==

हिंग कोणी खाऊ नये

हिंग शरीरासाठी फार गरम असते, प्रेग्नंट महिलांनी याचे सेवन करू नये. याव्यतिरिक्त असे खूप लोक आहेत त्यांना ब्लीडींग होते शरीरात बराचवेळ सूज राहते. त्यांनी हिंग खाऊ नये. आपल्या आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार