यावल : यावल तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. 32 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून सुमारे सहा वर्ष अत्याचार केला. या अत्याचारातून पीडीता तब्बत तीन वेळा गर्भवती राहिली मात्र त्यानंतरही तरुणाने लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणीने फैजपूर पोलिसात तक्रार दिली.
त्यांनतर संशयित रामचंद्र संघरत्न वाघोदे (वडगाव, ता.रावेर) याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत असे की, यावल तालुक्यातील 32 वर्षीय तरुणीशी संशयित रामचंद्र याने प्रेमसंबंध प्रस्थापीत करीत लग्नाचे आश्वासन दिले मात्र गारबर्डी धरण, भुसावळातील दोन हॉटेल्समध्ये 2017-2018 ते आतापर्यंत वेळोवेळी आरोपीने नेत तिच्यावर इच्छेविरोधात शारीरीक संबंध ठेवून अत्याचार केल्याने पीडीता तीनेवळा गर्भवती राहिली मात्र आरोपीने आयुर्वेदिक गोळ्या देवून पीडीतेचा गर्भपात केला.
फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर तरुणीने फैजपूर पोलिसात तक्रार दिल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. तपास सहाय्य निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एम.जे.शेख करीत आहेत.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






